Wednesday, 18 November 2020

अरबी समुद्रात मलबार नौदल कवायती सुरू.



🛳 भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया व जपान यांच्या नौदलांनी मंगळवारी उत्तर अरबी समुद्रात मलबार नौदल कवायती सुरू केल्या.


🛳 यात दोन विमानवाहू जहाजांसह अनेक आघाडीची लढाऊ जहाजे, पाणबुडय़ा आणि सागरी टेहळणी विमाने सहभागी झाली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.


🛳 चार दिवसांच्या या कवायतीचे प्रमुख आकर्षण भारतीय नौदलाच्या विक्रमादित्य कॅरियर बॅटल ग्रुप आणि अमेरिकी नौदलाच्या निमित्झ स्ट्राईक ग्रुप यांचा सहभाग आहे.


🛳 यएसएस निमित्झ हे जगातील सर्वात मोठे लढाऊ जहाज आहे.


🛳 मलबार कवायतींचा पहिला टप्पा ३ ते ६ नोव्हेंबर या कालावधीत बंगालच्या उपसागरात पार पडला. त्यात पाणबुडीरोधक आणि हवाई युद्धरोधक मोहिमांसह अनेक गुंतागुंतीच्या कवायती करण्यात आल्या.


🛳 ऑस्ट्रेलियन नौदलाने त्यांच्या एचएमएएस बलार्ट हे अंकाझ श्रेणीचे लढाऊ जहाज तैनात केले असून, जपानी नौदलाने त्यांची आघाडीची विनाशिका जेएस मुरासामे या कवायतींसाठी पाठवली आहे.


🛳 भारत व चीन यांच्यात पूर्व लडाखमध्ये सीमेवर सहा महिन्यांपासून तणाव असतानाच्या काळातच ही मोठी कवायत होत आहे. 


🛳 ‘क्वाड’ आघाडीचे भाग असलेल्या ४ देशांच्या नौदलांमध्ये गुंतागुंतीच्या मोहिमा समन्वयाने पार पाडणे हा त्यांचा उद्देश आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 12 & 13 जानेवारी 2025

◆ 12 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा करण्यात येतो.[स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस :- 12 जानेवारी] ◆ भारतीय हवामान विभाग (I...