Tuesday, 24 November 2020

महाराष्ट्राच्या ‘या’ जिल्ह्यात १ डिसेंबरपासून सुरू होणार शाळा.


🔰पालघर: जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपालिका व नगर पंचायत क्षेत्रातील तसेच बोईसर-तारापूर औद्योगिक परिसर क्षेत्रातील नववी ते १२ इयत्तेच्या विद्यार्थ्यांच्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालये ३१ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. तर उर्वरित ग्रामीण भागातील शाळा मात्र १ डिसेंबरनंतर शालेय व्यवस्थापन समितीला विश्वासात घेऊन सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे.


🔰जिल्ह्यातील नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याची अनुमती राज्य शासनाने दिली असून त्याबाबतचा जिल्हास्तरीय निर्णय घेण्यासाठी आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली होती. या बैठकीत शिक्षण विभाग तसेच आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांचा अभिप्राय जाणून घेतल्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे तसेच खासदार, आमदार आणि वसई विरार महानगरपालिका आयुक्त यांच्या उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आला.


🔰वसई विरार महानगरपालिका क्षेत्र, पालघर, डहाणू व जव्हार नगरपालिका क्षेत्र, तलासरी, वाडा, मोखाडा व विक्रमगड नगरपंचायत क्षेत्र तसेच बोईसर- तारापूर औद्योगिक क्षेत्रातील ग्रामपंचायत क्षेत्रांमध्ये ३१ डिसेंबरपर्यंत शाळा सुरू करू नयेत असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी दिले आहेत.


🔰तयाचप्रमाणे पाच हजारपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये तूर्तास शाळा सुरू करण्यात येऊ नये असे सूचित करण्यात आले आहे. मात्र ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या पालकांकडून ३० नोव्हेंबरपर्यंत संमती पत्र घेण्यात येणार आहे. त्या संमतीपत्रांनंतर स्थानिक परिस्थितीनुसार शाळा व्यवस्थापन समितीने निर्णय घेण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 02 जानेवारी 2025

◆ लीना नायर(कोल्हापूर) यांना ब्रिटिश एम्पायरच्या न्यू इयर ऑनर्स यादीमधील 'कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर' (CBE) हा प्रतिष्ठे...