Wednesday, 18 November 2020

कर्नाटकात मराठा विकास प्राधिकरणाची स्थापना.



🔰कर्नाटकात मराठा विकास प्राधिकरणाची स्थापना  करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांनी यासंबंधी आदेश दिला आहे.


🔰मराठा विकास प्राधिकरणासाठी 50 कोटींची तरतूद करण्यात आली असून निधी राखीव ठेवण्यात आला आहे.


🔰तसेच कर्नाटक राज्यात तसंच खासकरुन सीमारेषेवरील परिसरात वास्तव्यास असणाऱ्या मराठा समाजातील नागरिकांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.


🔰तर अधिकृत आदेशानुसार, गेल्या कित्येक दशकांपासून कर्नाटक राज्यात वास्तव्यास असणाऱ्या मराठा समाजाच्या विकासासाठी प्राधिकरणाची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


🔰मराठा विकास प्राधिकरणाचं मुख्य लक्ष्य समाजाच्या शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक आणि धार्मिक विकासाकडे असणार आहे.

No comments:

Post a Comment