Saturday, 14 November 2020

नागझिरा अभयारण्य



▪️निसर्गाला पडलेलं एक सुंदर स्वप्न म्हणून नागझिराच्या औचित्यपूर्ण गौरव केला जातो. जंगलात एक तळ असावं, तळ्याकाठी आज्ञाधारक रक्षाकाप्रमाणे उभे असणारे सरळ बुन्ध्यचे वृक्ष असावे, त्या वृक्षाचा प्रतिबिंब तळ्यात पडलेलं असावं. तळाच्या काठानें जाणारी वाट असावी, आजूबाजूला डोंगररांगा असाव्या, असे सारे कल्पनेत वाटणारे, प्रत्यक्ष पाहण्यासाठी नागझीरालाच जावे. रानात राहून या सर्व सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी या अभयारण्यात आधुनिक दर्जाची निवासगृहे पर्यटकांच्या सेवेसाठी हजर आहेत.



▪️गोंदिया जिल्ह्यातील हे अभयारण्य पानझडी वृक्षाचे आहे. 


✓तब्बल १५३ चौ.कि. मी. इतक्या मोठया क्षेत्रात पसरलेल्या या परिसरावर निसर्गाने आपले सगळे रंग मुक्तहस्ते उधळले आहेत. 


✓या अभयारण्यात साग, अंजान, धावडा, ऐन, तिवस, सप्तवर्णी यांचे उंच वृक्ष आढळतात. शिवाय मोहफुले, चार, आवळा, बेहडा, तेंभूर्णी इ. फळझाडेही बघावयास मिळतात. अंगाचा ताठा कायम ठेवून आकाशाला भिडणारी बांबूची बेटे देखील नजरेस भुरळ पाडून जातात.



▪️वन्य प्राण्यांच्या अस्तित्वामुळे या अभयारण्याचे अरण्यपण अधिकच गडद होताना दिसते. 


✓वाघ, बिबटे, रानगवे, चितळ, सांभर, नीलगाय, अस्वल इ. प्राणी इथे मुक्तपणे संचार करतात. येथील वनविभाग येणा-या पाहुण्यांच्या स्वागतासाठी नेहमीच तत्पर असतो. वनविभागाच्या वतीने जवळच्या पिटेझारी व चोर ख्म्बारा गावातील तरुणांना गाईड साठीचे प्रशिक्षण दिले गेले आहे. 


✓आग टेहळणी बुरुजावरून लांबवर पसरलेल्या या अभयारण्याचे विहंगम अवलोकन करताना त्याचा विशालतेची व विशेषतेची खात्री पटते.


✓ शिवाय टायगर पॉईंट, बंदर चूवा पॉईंट, वाकडा वेहाडा, हत्ती खोदारा रोड अशी विविध ठिकाणी निसर्गाची निरनिराळी रूपे पहावयास मिळतात. 


✓हे सारे निसर्गाचे सौंदर्य डोळ्यात साठवताना अक्षरशः कसरत करावी लागते. म्हणूनच महाराष्ट्रातील या वैविध्यतेने नटलेल्या अभयारण्याची वाट पुनःपुन्हा येण्यासाठी खुणावत राहते.

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 02 जानेवारी 2025

◆ लीना नायर(कोल्हापूर) यांना ब्रिटिश एम्पायरच्या न्यू इयर ऑनर्स यादीमधील 'कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर' (CBE) हा प्रतिष्ठे...