🅾️उत्तर प्रदेशातील दुधवा राष्ट्रीय उद्यान वाघ आणि रेनडिअरसाठी जगप्रसिद्ध आहे. दुधवाचा उत्तर किनारा नेपाळसोबतच्या आंतरराष्ट्रीय सीमेला लागून असून, त्याच्या दक्षिणेला सुहेली नदी वाहते. दुधवात घनदाट हिरवेगार जंगल, उंच गवत आणि अनेक प्रकारचे वृक्ष आढळून येतात.
🅾️हरणांच्या अनेक प्रजातींशिवाय वाघ, बिबट्या, रेनडीअर, हत्ती, कोल्हा, तडस आणि एकशिंगी गेंडा आदी प्राणी येथे आहेत. मोरासह पक्ष्यांच्या अनेक प्रजातींचेही हे वस्तिस्थान आहे. दुधवा हे उत्तर प्रदेशातील जैव विविधतेने समृद्ध असे सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान असून ते खिरी जिल्ह्यात आहे.
🅾️१ फेब्रुवारी १९७७ साली दुधवा जंगलाला राष्ट्रीय उद्यान घोषित करण्यात आले. त्यानंतर १९८७-८८ मध्ये किशनपूर वन्यजीव क्षेत्राला दुधवात सामील करून याला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा दिला गेला.
🅾️दधवात सरासरी १५०० मि.मी. पाऊस होतो. नोव्हेंबर ते फेब्रुवारीदरम्यान येथे कमाल तापमान २० ते २० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान ४ ते ८ अंश सेल्सिअस असते. पहाटे धुके आणि रात्री थंडी पडते.
🅾️मार्च आणि मेदरम्यान कमाल तापमान ३० ते ३५ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २० ते २५ अंश सेल्सिअससह वातावरण आल्हाददायक असते. जून ते आॅक्टोबर या काळात उन्हाळा असला तरी येथे मुसळधार पाऊस पडतो.
No comments:
Post a Comment