Friday, 13 November 2020

मराठी व्याकरण


प्रश्न(१) 'दादा पायी चालत आले' या वाक्यातील 'पायी' या सप्तमी विभक्तीच्या रूपाचा कारकार्थ कोणता? 

१) अधिकरण

२) करण✅

३) अपदान

४) कर्ता

🍁🍁🍁🍁🍁🍁


प्रश्न(२) योग्य पर्याय निवडा

मृच्छकटीक 

१) मृच्छ + कटिक

२) मृत + छकटिक

3) मृत्+ शकटिक✅

४) मृच्च + कटिक

🍁🍁🍁🍁🍁🍁


प्रश्न(३) मराठी भाषेचा अभिजात दर्जा शोधण्यासाठी शाषणाने ---------- यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती.

१) शाम मनोहर

२) कोतिकराव ठाले पाटील

३) नरेन्द्र जाधव

४) रंगनाथ पठारे✅

🍁🍁🍁🍁🍁🍁


प्रश्न(४) 'अधोमुख' या शब्दाचा विरुद्ध अर्थ सांगा.

१) संमुख

२) उन्मुख✅

३) विमुख

४) दुर्मुख

🍁🍁🍁🍁🍁🍁


प्रश्न(५) 'अश्वत्थ' या शब्दाचा समान अर्थ -

१) वड

२) पिंपळ✅

३) कदंब

४) उंबर

🍁🍁🍁🍁🍁🍁


प्रश्न(६) योग्य शब्दाची निवड करा.

पिस्तुल पाहून साक्षीदाराला न्यायालयातच  ........... आली.

१) घेरी

२) चक्कर

३) मूर्च्छा✅

४) भोवळ

🍁🍁🍁🍁🍁🍁


प्रश्न(७) पद्याची रचना ज्या शास्त्राच्या आधाराने होत असते किंवा अनेक प्रकारच्या पद्यांवरून जे शास्त्र तयार झालेले आहे त्याचे नाव कोणते?

१) काव्यशास्त्र

२) साहित्यशास्त्र

३) टीकाशास्त्र

४) छंदशास्र ✅

🍁🍁🍁🍁🍁🍁


प्रश्न(८) " होते जनात अपकीर्ती निरक्षरांची" या काव्यातील वृत्ते ओळखा.

१) इद्रवज्रा

२) उपेंद्रवज्रा

३) भ्रांतिमान

४) वसंततिलिका✅

🍁🍁🍁🍁🍁🍁


प्रश्न(९) पुढील गण कोणत्या वृत्ताचे आहेत? 

म   स   ज   स   त   त   ग 

१) भुजंगप्रयात

२) वसंततिलिका

३) आर्या

४) शार्दूलर्विक्रीडित✅

🍁🍁🍁🍁🍁🍁


प्रश्न(१०) चुकीची जोडी ओळखा.

१) सलाम - मंगेश पाडगावकर

२) पैस - दुर्गा भागवत

३) झोंबी - आनंद गायकवाड✅

४) खूणगाठी - ना.घ. देशपांडे

🍁🍁🍁🍁🍁🍁

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 02 जानेवारी 2025

◆ लीना नायर(कोल्हापूर) यांना ब्रिटिश एम्पायरच्या न्यू इयर ऑनर्स यादीमधील 'कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर' (CBE) हा प्रतिष्ठे...