Saturday, 28 November 2020

वरुणास्त्र’: भारताचा स्वदेशी टॉरपीडो


➡️भारताच्या संरक्षण संशोधन व विकास संघटनेचे अध्यक्ष जी. सतीश रेड्डी यांच्या हस्ते ‘वरुणास्त्र’ या स्वदेशी टॉरपीडोच्या पहिल्या निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन झाले. पाणबुडी किंवा जहाज नष्ट करण्यासाठी टॉरपीडो हे सर्वात अचूक शस्त्र आहे.


💎ठळक वैशिष्ट्ये ..


‘➡️वरुणास्त्र’ हा भारताचा पहिला पूर्ण स्वदेशी टॉरपीडो आहे.वरुणास्त्र 40 किलोमीटर अंतरापर्यंत कोणतीही पाणबुडी नष्ट करण्यास सक्षम आहे. ते ताशी 74 किलोमीटर वेगाने हल्ला करते.वरुणास्त्र टॉरपीडोचे वजन सुमारे दीड टन आहे. ते पाणबुडीभेदी टॉरपीडो असून यात 250 किलो स्फोटके वाहून नेण्याची क्षमता आहे.


➡️खोल आणि उथळ पाण्यातल्या पाणबुड्यांनाही या टॉरपीडोने लक्ष्य करता येणार. त्यात जोडलेल्या ‘GPS’ यंत्रणेमुळे लक्ष्याचा अचूकपणे वेध घेणे या टॉरपीडोला सहज शक्य आहे.

इतर बाबी


➡️वरुणास्त्राने भारतीय युद्धनौका आणि सिंधू श्रेणीतली पाणबुडी सुसज्ज असणार.संरक्षण संशोधन व विकास संघटनेच्या (DRDO) विशाखापट्टणम येथील ‘नेव्हल सायन्स अँड टेक्नॉलॉजिकल लॅबोरेटरी’ने (NSTL) वरुणास्त्र विकसित केले आहे. तर ‘भारत डायनॉमिक्स लिमिटेड’ने (BDL) त्याचे उत्पादन सुरू केले आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...