Wednesday, 4 November 2020

मध्यप्रदेशातील खडककला जगातील प्राचीन.


🅾️मध्यप्रदेशातील मंडसौर जिह्यामधील भानपूर क्षेत्रातील एका टेकडीमधील खडकावर कोरलेली चित्रे जगातील सर्वात जुनी असून तज्ञांच्या मते ती 2 ते 5 लाख वर्षांपूर्वीची असावीत, असा अंदाज आहे. चालू नोव्हेंबरच्या 2 ते 23 पर्यंत झालेल्या यशस्वी मोहिमेने हे नवीन रहस्य जगापुढे आणले आहे. आर्ट सोसायटी ऑफ इंडियाचे सरसचिव प्रा. गिरिराज कुमार आणि ऑस्ट्रेलियन वैज्ञानिक रॉबर्ट बेडनरिक यांच्या संयुक्त सहकार्यातून सदर मोहीम यशस्वी करण्यात आली. बेनरिक हे खडककलेतील जागतिक कीर्तीचे वैज्ञानिक असून ते ‘इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ रॉक आर्ट ऑर्गनायझेशन’ चे (आयएफआरएओ) समन्वयक आहेत. आग्य्रातील दयाळबाग एज्युकेशनल इन्स्टिटय़ूटमधील रॉक आर्ट सायन्सचे कुमार प्राध्यापक आहेत. त्यांनीच सदर खडकचित्रकलेचे वय 2 ते 5 लाख वर्षांचे असल्याबद्दलचा अंदाज व्यक्त केला.


🅾️दर की चट्टान गुहेतील खडकावर कलात्मक चित्र असल्याचा शोध 2002 च्या प्रारंभी लागल्याने त्यासंदर्भात संशोधन सुरू झाले. त्याजागी प्रहार केल्याने निर्माण झालेले दगडही 5 लाख वर्षांपूर्वीचे असावेत, असे कुमार यांनी सांगितले. खडक प्रकल्पाचा तपशील सांगताना ते म्हणाले की सदर प्रकल्पाच्या कामाने ही मोहीम रूंपली दर की चट्टान गुहेतील खडकांचे नमुने व तपशील जाणण्याचा यामागील हेतू होता. यासाठी भारतासह ऑस्टेलिया व युरोपमधील वैज्ञानिकांनी भाग घेतला आहे.


No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...