Monday 2 November 2020

वातावरणाचे थर.

 

🅾️वातावरणाची सरासरी उंची किंवा जाडी १६०० किमी असून भूपृष्ठपासून जसजसे उंच जावे तसतशी वातावरणाची घनता कमी होत जाते.


 🧩वातावरणाचे मुख्य थर ...


🅾️ तपांबर - भूपृष्ठाच्या अगदी नजीकचा वातावरणाचा थर म्हणजे तपांबर होय, याची सरासरी जाडी ११ किमी आहे. या थरात वातावरणातील ७५% घटक आढळून येतात. पाऊस, वारे, ढगनिर्मिती आदी हवामान विषयक या थरात आढळून येतात.


🅾️ तपस्तधी - तपांबर व स्थितांबर या थरांना अलग करणारा उपथर म्हणजे तपस्तधी होय. उंचीनुसार तापमानात घट होण्याची क्रिया या उपथरात थांबते.


🅾️ सथितांबर - तपांबरानंतर सुमारे ५० किमी उंचीपर्यंतचा थर म्हणजे स्थितांबर होय. या थरातील वातावरणात पाण्याची वाफ, धूलिकण, नसतात. व हवा शुष्क असते.


🅾️ सथितस्तबधी - स्थितांबराच्या वरचा सुमारे ३ किमी जाडीचा थर म्हणजे स्थितस्तबधी होय. या थरातील तापमान स्थिर असते. या थरात दोन्ही बाजूना ओझोन वायूचा थर आढळतो. हा वायू सूर्यापासून येणारी अतिनील किरणांचे रक्षण करतो.


🅾️ मध्यांबर - स्थितस्तबधी नंतर भूपृष्ठापासून सुमारे ८० किमी चा थर म्हणजे मध्यांबर होय. या थरात वाढत्या उंचीनुसार तापमानात घट होते.


🅾️मध्यस्तबधी - पृथ्वीच्या वातावरणातील सर्वात कमी नोंद ज्या थरात होते तो थर म्हणजे मध्यस्तबधी होय.


🅾️ दलांबर - मध्यस्तबधी या थरानंतर अत्यंत विरळ असलेला हवेचा थर म्हणजे दलांबर होय. या थरात उंचीनुसार तापमान वाढते.


🅾️ आयनांबर - दलांबराच्या नंतरचा थर म्हणजे आयनांबर आहे. या थरात उंचीनुसार तापमान वाढते. या थरातील अतितापमानामुळे हेवेचे कण विद्युतप्रभारित होतात.


🅾️बाह्यंबार - आयनांबराच्या वरचा थर म्हणजे बाह्यांम्बर होय. भूपृष्ठापासून ४८० किमी उंचीपासून वरील भागात हा थर पसरलेला आहे. या थरातील विविध वायूंचे अनु, रेणू, पृथ्वीच्या गुरुत्वाकर्ष्णातील मुक्त होऊन अंतराळात विलीन होतात.


No comments:

Post a Comment