Tuesday, 24 November 2020

न्यूझीलंडमध्ये महिला पोलिसांना हिजाब परिधानाची परवानगी.


🔰नयूझीलंडमध्ये पोलीस दलात मुस्लीम महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्या गणवेशात ‘हिजाब’चा समावेश करण्यात आला आहे. पण हा हिजाब विशिष्ट पद्धतीचा आहे. कॉन्स्टेबल झिना अली या ‘हिजाब’ गणवेश परिधान करणाऱ्या पहिल्याच आहेत.


🔰झिना (वय ३०) या ख्राइस्ट चर्च दहशतवादी हल्ल्यानंतर गेल्या वर्षी पोलीस दलात सामील झाल्या. त्यावेळी न्यूझीलंडमध्ये दोन मशिदींवर हल्ला करण्यात आला, त्यात ५१ जण ठार झाले होते.


🔰या आठवडय़ात त्या पोलीस अधिकारी झाल्या असून हिजाब परिधान करणाऱ्या पहिल्या महिला पोलीस ठरल्या आहेत. झिना यांनी हा गणवेश तयार करण्यात मोठी भूमिका पार पाडली. यात धर्म व संस्कृती दोन्हींचा समावेश आहे.

No comments:

Post a Comment