💥अमेरिकेत नुकतीच राष्ट्राध्यक्ष निवडणूक पार पडली असून या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव झाला. तर जो बायडेन अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत. मात्र निवडणुकीचे निकाल हाती आल्यानंतरही डोनाल्ड ट्रम्प आपल्या दावर अडून राहिले होते आणि आपला पराभव मान्य करण्यास तयार नव्हते. पण आता अखेर डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तांतरणाची प्रक्रिया सुरु करण्यासाठी परवानगी दिली आहे.
💥अमेरिकेतील निवडणुका होऊन तीन ते चार आठवडे उलटले असून डोनाल्ड ट्रम्प निकाल आपल्या बाजूने येईल असा विश्वास वारंवार व्यक्त करत होते. निकाल आल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेकदा जो बायडेन आणि त्यांच्या डेमोक्रॅटिक पक्षावर निशाणा साधला आहे.
💥निवडणुकीचा निकाल स्पष्ट असतानाही डोनाल्ड ट्रम्प अजिबात पराभव मान्य करत नव्हते. यासाठी त्यांनी कायदेशीर मार्गही निवडला होता. पण तिथेदेखील त्यांच्या हाती निराशाच आली. अशा परिस्थितीत अखेर डोनाल्ड ट्रम्प पराभव मान्य करताना दिसत आहेत.
💥डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या जीएसएला (General Service of Administration) सत्तांतरणाच्या प्रक्रियेला परवानगी दिली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी जे करण्याची गरज आहे ते करा असं सांगितलं आहे. यानंतर अमेरिकेच्या जीएसए एमिली मर्फी यांनी जो बायडेन यांना पत्र लिहिलं असून सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिलं आहे.
No comments:
Post a Comment