Tuesday, 24 November 2020

जागतिक आरोग्य संघटनेत अमेरिकेचा पुन्हा सहभाग



🔰चीनने आंतरराष्ट्रीय नियमाधिष्ठित व्यवस्थेचे पालन करावे, असे मत अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष जो बायडेन यांनी व्यक्त केले असून जागतिक आरोग्य संघटनेत अमेरिका पुन्हा सहभागी होईल, असे स्पष्ट केले आहे.


🔰करोना साथ वाईट पद्धतीने हाताळून चीनच्या हातचे बाहुले बनल्याची टीका करत ट्रम्प प्रशासनाने जागतिक आरोग्य संघटनेतून माघार घेतली व त्यांचा निधीही बंद केला होता. बायडेन यांनी गुरुवारी  सांगितले, की चीनने नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. अध्यक्षीय चर्चेत बायडेन यांनी चीनला शिक्षा करण्याचे वक्तव्य केले होते पण त्यावर खुलासा करताना त्यांनी आता असे म्हटले आहे,  चीनने संघटनेच्या नियमांचे पालन करावे एवढेच आमचे म्हणणे आहे.


🔰सत्ता हाती घेताच पहिल्या दिवसापासून आम्ही जागतिक आरोग्य संघटनेत परत सामील होऊ असे सांगून ते म्हणाले, की पॅरिस हवामान करारातही आम्ही पुन्हा सहभागी होऊ. जगातील इतर देश व अमेरिका मिळून काही सीमारेषा स्पष्ट करणे गरजेचे आहे, ज्या चीनला समजतील असे त्यांनी म्हटले आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...