Tuesday, 24 November 2020

शंभर वर्षांपूर्वी चोरलेली अन्नपूर्णेची मूर्ती लवकरच भारतात.


🔰वाराणसीतील मंदिरातून १०० वर्षांपूर्वी चोरण्यात आलेली आणि कॅनडातील एका विद्यापीठाच्या कला दालनात ठेवण्यात आलेली अन्नपूर्णा या हिंदू देवतेची मूर्ती कॅनडातील संबंधित विद्यापीठ लवकरच भारताकडे सुपूर्द करणार आहे.


🔰मकेन्झी कलादालनात रेजिना विद्यापीठाचा वस्तुसंग्रह असून तेथे सध्या ही मूर्ती ठेवली आहे. जवळपास १०० वर्षांपूर्वी ही मूर्ती चुकीने नेण्यात आल्याचे मॅकेन्झीच्या संग्रहालयाची पाहणी करीत असताना दिव्या मेहरा या कलाकाराच्या निदर्शनास आले, असे विद्यापीठाने एका निवेदनात म्हटले आहे.


🔰अन्नपूर्णा देवीची ही मूर्ती आभासी पद्धतीने भारतात पाठविण्याचा समारंभ १९ नोव्हेंबर रोजी पार पडला. मात्र आता ही मूर्ती लवकरच भारतात आणण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. ही मूर्ती अधिकृतपणे भारतात पाठविण्यासाठी विद्यापीठाचे अंतरिम अध्यक्ष आणि कुलगरू डॉ. थॉमस चेस यांनी कॅनडातील भारतीय उच्चायुक्त अजय बिसारिया यांच्याशी दूरचित्रसंवाद साधला.

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 02 जानेवारी 2025

◆ लीना नायर(कोल्हापूर) यांना ब्रिटिश एम्पायरच्या न्यू इयर ऑनर्स यादीमधील 'कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर' (CBE) हा प्रतिष्ठे...