🔰भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजे इस्रोच्या शुक्रयान मोहिमेसमवेत वैज्ञानिक उपकरणे पाठवण्यासाठी परदेशातून अनेक प्रस्ताव आले असून त्यात वीस प्रस्तावांची प्राथमिक निवड करण्यात आली आहे. यात फ्रान्सच्या प्रस्तावाचाही समावेश आहे. याशिवाय रशिया, स्वीडन व जर्मनी या देशांचेही प्रस्ताव असून ते देशही भारताच्या शुक्रयानासमवेत संशोधनासाठी वैज्ञानिक उपकरणे पाठवण्यास तयार आहेत.
🔰शक्राच्या अभ्यासासाठी हे यान पाठवले जाणार असून त्यात परदेशांतून वैज्ञानिक उपकरणे पाठवण्यासाठी काही प्रस्ताव आले होते, त्यातील वीस वैज्ञानिक उपकरणांची प्राथमिक निवड करण्यात आली आहे. हे २० पेलोड म्हणजे वैज्ञानिक उपकरणे वेगवेगळे प्रयोग करण्यासाठी पाठवले जाणार आहेत.
🔰फरान्सच्या सीएनइएस संस्थेचे ‘व्हीनस इन्फ्रारेड अॅटमॉस्फेरिक गॅस लिंकर’ हे उपकरण रशियाच्या रॉसकॉसमॉस अवकाश संशोधन संस्थेच्या मदतीने तयार करण्यात आले आहे. फ्रान्सच्या सीएनआरएस संस्थेने ‘लॅटमॉस’ नावाचे उपकरण तयार केले असून त्याच्या मदतीने शुक्राच्या वातावरणाचा अभ्यास करता येईल.
No comments:
Post a Comment