Thursday, 26 November 2020

उमंग इंटरनॅशनल”: उमंग मोबाईल अ‍ॅपची आंतरराष्ट्रीय आवृत्ती


♒️कद्रीय इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्री रवी शंकर प्रसाद यांच्या हस्ते उमंग अॅपच्या आंतरराष्ट्रीय आवृत्तीचे अनावरण करण्यात आले.


♨️ठळक बाबी ...


♒️परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या समन्वयाने “उमंग इंटरनॅशनल” अॅपमार्फत भारत सरकारच्या सेवा दिल्या जाणार आहेत.

ही आवृत्ती अमेरिका, इंग्लंड, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, संयुक्त अरब अमिरात, नेदरलँड, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलँड या निवडक देशांसाठी तयार करण्यात आली आहे.


♒️अपमार्फत भारतीय आंतरराष्ट्रीय विद्यार्थी, अनिवासी भारतीय, परदेशातले भारतीय पर्यटक यांना भारत सरकारच्या सेवांचा कोणत्याही वेळी लाभ घेता येणार.

उमंग अॅपवर उपलब्ध असणाऱ्या भारतीय सांस्कृतिक सेवांमुळे भारताला जागतिक पातळीवर नेण्यास मदत होणार आणि परदेशी पर्यटकांमध्ये भारताला भेट देण्याविषयी आवड निर्माण होणार.


♨️उमंग अ‍ॅपविषयी...


♒️“उमंग” (UMANG - युनिफाईड मोबाईल अ‍ॅप्लीकेशन फॉर न्यू-एज गवर्नन्स) मोबाईल अ‍ॅप हा भारत सरकारचा एकल, एकात्मिक, सुरक्षित, बहुविध, बहु-भाषी, बहु-सेवा मोबाईल अ‍ॅप (सुपर-अ‍ॅप) आहे. अॅपमार्फत केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध विभागाच्या उच्च प्रभावित सेवा प्रदान केल्या जातात.


♒️उमंगची निर्मिती इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स विभाग (NeGD) यांनी केली आहे. त्याचे लोकार्पण 23 नोव्हेंबर 2017 रोजी करण्यात आले होते.


♒️“उमंग” अ‍ॅपने तीन वर्षे पूर्ण केली असून 2000 पेक्षा अधिक सेवांचा महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. अ‍ॅपवर सध्या 2039 सेवा (88 केंद्रीय विभागाच्या 373 सेवा, 27 राज्यांच्या 101 विभागाच्या 487 सेवा आणि 1179 सेवा उपयोगिता बिल देयके) उपलब्ध आहेत आणि यात निरंतर वाढ होत आहे.

No comments:

Post a Comment