स्वामी विवेकानंदांचे मुळचे नाव नरेंद्र. रामकृष्ण परमहंससारख्या तपस्वींनी, श्रेष्ठ गुरूंनी त्यांना "विवेकानंद" नाव दिले. लहानपणापासूनच नरेंद्र तल्लख बुद्धीचा, संवेदनाक्षम व विचारी ! काहीसा एक्कल कोंडा पण तेजस्वी! भारतीय संस्कृती, धर्म, रीती भाती इ.चा सखोल अभ्यास केला. वाचनाची प्रचंड आवड, उत्कृष्ट वक्ता! त्याच्या शब्दांनी परकीयांना मोहून टाकले. प्राथमिक गरजांची पूर्ती करणारे शिक्षण स्वामींना अभिप्रेत होते. भारतातील अध्य्त्म आणि पाश्चात्यांचे विज्ञान एकत्र असल्याच भारत जगातील सर्वश्रेष्ठ राष्ट्र ठरेल. त्यासाठी परदेशात जाऊन विद्यार्थाने शिकावे व शिकवावे असे त्यांचे विचार होते.
नव-नवीन विचार रोज आत्मसात करावेत. मानोंनिग्रह हवा. त्यासाठी मन-साक्षरता जरुरी, मुलांना योग्य स्वातंत्र्य देणे गरजेचे, वृत्तीमध्ये सतत बदल व्हावे तरच देशाची उन्नती होईल. असे त्यांचे मत होते. प्रत्येक स्त्री मधे पुरुषतत्वे असतात. तसेच प्रत्येक पुरुषात स्त्री तत्वे असतात. त्यामुळे स्त्री-पुरुष समानता मानने गरजेचे असे ते म्हणत! वृत्तीने संन्यस्त होते, पण सर्व विषयांचा सखोल अभ्यास होता. विचार परखड, वाणी शुद्ध, स्पष्ट, अनेक भाषा अवगत होत्या. कलकत्त्या जवळ हुबळी नदीच्या काठी बेल्लूर मठाची स्थापना केली. कट्टर हिंदुवादी होते. मानवतावादाचा, तत्वाचा प्रसार करू मार्गदर्शन केले.
स्वामी विवेकानंद जयंती हा दिवस युवक दिन म्हणून साजरा करतात. युवकात सर्व प्रकारचे बल असते. तारुण्यात प्रवेश करताना युवा पिढीला अनेक आव्हानांना, स्पर्धेला सामोरे जावे लागते. युवा पिढी इंटरनेट व मोबाईल च्या जाळ्यात अडकत आहे. यंत्राचे आपण गुलाम होण्यापेक्षा यंत्राच्या सहाय्याने आपल्यातील बल वाढवणे, बुद्धीला चालना देणे यासाठी यंत्राचा वापर करावा. अति वापरणे बुद्धीला गंज चढतो. shortcuts वर वर चांगले, पण चिकाटी धरून अंतरापर्यंत जाऊन शिक्षण घेण्याचे बळ मिळवणे जरुरी. नाविन्याची ओढ, उमेद व जोम आहे. पण योग्य दिशेचा अभाव प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढण्याचे बळ अंगी कारावे. आयत्या वाढलेल्या तटावर कोणीही ताव मारेल, पण ताट उपलब्ध करण्याचे बळ (क्षमता) हवी.
भाषा-सदृश्य व प्रवाही हवी. सतत शिकत राहण्याची क्षमता वृत्ती अंगी बाणणे जरुरी. सकारात्मक दृष्टी हवी. विवेकानंदाप्रमाणे पराकोटीचे उच्च विचार करण्याची तयारी करणे. उच्च विचार करण्याची सवय लागली की आचरण शुद्ध होते
जागतिकीकरणामुळे जग जवळ आले. work satisfaction नाही, संधी नाही, असे नकारात्मक विचार न आणता सकारात्मक विचारांचे बळ अंगीकारावे. Selfhelp, self study हे तत्व चिरंतन आहे. सतत कोणाच्या तरी खांद्यावर आपले ओझे न टाकता आपलेच खांदे मजबूत करणे महत्वाचे! संयम, शांतता हे गुण योगोभ्यासाने अंगी बांधतात. पालकांनी बालकाचे आत्मिक बळ वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत. सतत अपेक्षांचे, इच्छांचे ओझे पाल्यांवर घालु नये. जीवनातल्या बदलत्या परिस्थितीनुसार बदलने जरुरी याची जाणीव करून देणे गरजेचे! स्पर्धेचा घोडा बनू नये किंवा जे मागेल ते ते पुरवणे असेही अति लाड करू नयेत. उंच भरारी सर्वच जन मारू शकत नाहीत, पण दुबळेपणा झटकून जमिनीवर घट्ट पाय रोऊन जमीन (धरणीमाता) सुवर्णमय बनवण्याचे बळ बालकांच्यात निर्माण करणे, त्यांना सुखी करणे महत्वाचे! हीच स्वामीजींना भावपूर्वक श्रद्धांजली.
No comments:
Post a Comment