Wednesday, 4 November 2020

सौम्य करोनाचे सात लक्षणसमूह



- कोविड १९ संसर्गातून निर्माण होणाऱ्या लक्षणांचे सात नवीन प्रकार वैज्ञानिकांनी शोधून काढले आहेत. करोना विषाणूचा संसर्ग झाल्यानंतरही दहा आठवडय़ांच्या काळात प्रतिकारशक्ती प्रणालीत बदल झालेले दिसून आले आहेत. या संशोधनाचा उपयोग करोना रुग्णांनी नंतर कशी काळजी घ्यावी किंवा सक्षम लस नेमकी कशा स्वरूपाची असावी हे ठरवण्यासाठी होणार आहे.


- अ‍ॅलर्जी या नियतकालिकात प्रसिद्ध 


-  व्हिएन्नातील वैद्यकीय विद्यापीठातील वैज्ञानिकांनी हे संशोधन केले असून त्यांच्या मते करोनाचे एकूण सात लक्षणसमूह निष्पन्न झाले आहे 


- त्यात फ्लू सदृश ताप, थंडी, थकवा व कफ यांचा समावेश आहे. 


- दुसऱ्या प्रकारात सर्दीसारखी लक्षणे म्हणजे शिंका, घसा कोरडा पडणे, नाक चोंदणे, स्नायुदुखी यांचा समावेश आहे. काही रुग्णांमध्ये डोळे व श्लेष्मल आवरणाची आग होते. 


- फुफ्फुसाच्या समस्या, न्यूमोनिया,श्वास घेण्यात अडथळे, आतडय़ाच्या समस्या जसे की अतिसार, मळमळणे, डोकेदुखी, वास व चव जाणे या सारख्या लक्षणांचाही समावेश आहे.


- रुग्णांच्या एका गटात असे दिसून आले की, वास व चव गेलेल्या व ज्यांची प्रतिकारशक्ती प्रणाली ‘तरुण’ आहे त्यांच्यात टी लिंफोसाइटस जास्त असतात व त्या करोना संसर्गात थायमस ग्रंथीतून स्थलांतरित होतात असे यातील सह संशोधक विनफ्राइड एफ पिकल यांनी म्हटले आहे.


◾️नमके काय परिणाम होतात..

कोविड १९ विषाणू नेमके काय परिणाम शरीरात करतो याबाबत उदाहरण देताना त्यांनी सांगितले की, मानवी प्रतिकारशक्ती प्रणालीतील ग्रॅन्युलोसाइटस या पेशी जीवाणू तसेच विषाणूंशी लढण्याचे काम करतात. 


- कोविड १९ रुग्णात त्या कमी झालेल्या दिसून आल्या. सीडी ४ व सीडी ८ टी पेशी या प्रतिकारशक्तीतील स्मृती पेशींच्या संचाचे काम करतात त्यातील सीडी ८ टी नावाच्या पेशी जास्त क्रियाशील झालेल्या दिसून आल्या. 


- याचा अर्थ सुरुवातीच्या संसर्गानंतर या पेशी बराच काळ लढत राहतात. अनेक रुग्णांच्या रक्तात प्रतिपिंड निर्माण करणाऱ्या प्रतिकारशक्ती पेशींची पातळी वाढलेली दिसली. 


- कमी पातळीवरच्या करोना संसर्गात जेवढा ताप जास्त तेवढे प्रतिपिंड जास्त दिसून आले. करोना १९ विषाणूशी लढताना आपली प्रतिकारशक्ती दुप्पट शक्तीने काम करीत असते असे दिसून आले आहे.


-  प्रतिकारशक्ती प्रणाली व प्रतिपिंड हे दोन्ही झुंज देतात. या संशोधनाचा उपयोग प्रभावी लस तयार करण्यासाठी होऊ शकतो.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...