Monday 2 November 2020

गोपाळ कृष्ण गोखले



1.जन्म - चिपळूण 1 मे 1866


2.गोपाळराव यांचे वडील आणि रानडे एकाच शाळेत होते.म्हणून "गोखलेंचे गुरु रानडे".


3.महात्मा गांधी पुण्यात आले. तेव्हा पहिले टिळक आणि नंतर लगेच गोखलेंना भेटले.गांधींचे "राजकीय गुरू" गोखले.


4.आपल्याला गोखल्यांच्या चित्रामध्ये एक 'उपरण' दिसते. ते सुद्धा त्यांना रानडेनी  दिले होते.


5. गोखले 1884 ला मुंबई विध्यापिठातून बी.ए पास झाल्यावर कोल्हापूरच्या बर्वे प्रकरणात टिळक आणि आगरकर यांना 4 महिन्यांची शिक्षा झाली. त्या साठी पुण्यातून टिळक फंड गोळा होत होता.त्या साठी गोखले शिकत असलेल्या कॉलेज मधील मुलांनी शेक्सपिअरच्या कॉमेडी ऑफ एरोर("भ्रांतिकृत चमत्कार") नाटक बसवले. त्यात गोखलेंनी "गोसावणीची" भूमिका केली.


6.नंतर न्यू इंग्लिश स्कूल मध्ये शिक्षक म्हणून नोकरी लागली.(35 रु महिना पगार)


7.आगरकर यांच्या "सुधारकचे" ते इंग्रजी विभागाचे प्रमुख होते.


8.1890 ला "सार्वजनिक सभेचे सेक्रेटरी" झाले.


9.1895 ला  त्यांनी सेक्रेटरी पदाचा राजीनामा दिला.


10.भारताच्या आर्थिक बाबींचा अभ्यास करण्यासाठी आलेल्या वेलबी कमिशन समोर गोखलेंनी साक्ष दिली.

(साक्ष देणारे इतर - सुरेंद्रनाथ ब्यानर्जी, सुब्रह्मामण्यम अय्यर,वाच्छा)


11.1902 ला फर्ग्युसनचे काम सोडले.


12.बंगालची फाळणी झाल्यावर इंग्लंड सरकारचे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसने त्यांना इंग्लंडला पाठवले.


13.1905 च्या "वाराणसी" काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष झाले.


14.12 जून 1905 ला पुण्यात भारतीय सेवक समाजची स्थापना केली.

( सहकारी - अनंत विनायक पटवर्धन,गोपाळ कृष्ण देवधर,नरेश अप्पा द्रविड)


15.सभासद होण्यासाठी पदवीधर अट घातली.


16.27 डिसेंबर 1907 ला सुरत अधिवेशनात काँग्रेसमध्ये ज्या ठरवामुळे फूट पडली,त्या ठरावाचा मसुदा गोखलेंनी तयार केला होता.


गोखले बद्दल उद्गार -

"तोफखाण्यासमोर मी उभा राहील गोखलेंशी कसा सामना करावा यांची चिंता वाटते." - लॉर्ड किचनेर(ब्रिटिश लष्कर अधिकारी)

No comments:

Post a Comment