Tuesday, 24 November 2020

रामायण, महाभारतामधील गोष्टी ऐकत मोठा झालो - बराक ओबामा.


🔰अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या ‘अ प्रॉमिस्ड लँड’ या पुस्तकाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. आपल्या राजकीय प्रवासापासून ते खासगी गोष्टींपर्यंत अनेक गोष्टींवर ओबामा यांनी भाष्य केलेलं पुस्तक सध्या भारतातही चांगलेच चर्चेत आहे. याच पुस्तकामध्ये भारतीय काँग्रेससंदर्भात ओबामा यांनी व्यक्त केलेल्या मतांमुळे सध्या देशातील राजकारण चांगलेच तापले आहे. मात्र याच पुस्तकामध्ये ओबामा यांनी आपले बालपण हे रामायण, महाभारतामधील गोष्टी ऐकत गेल्याचे म्हटले आहे.


🔰भारत आणि तेथील संस्कृतीबद्दल आपल्या मनात कायम विशेष स्थान राहिलं आहे. याचं मुख्य कारण म्हणजे इंडोनेशियामध्ये बालपण गेलं असून तिथे मी बालपणी रामायण, महाभारतामधील गोष्टी अनेकदा ऐकल्याचा उल्लेख ओबामांनी केला आहे.


🔰“भारताचे आकारमान आणि जागतिक लोकसंख्येपैकी प्रत्येक सहावी व्यक्ती या देशात रहात असल्याने, वेगवेगळ्या वंशाचे दोन हजारहून अधिक संस्कृती आणि सातशेहून अधिक भाषा बोलला जाणारा हा देश असल्याने त्याचा अधिक प्रभाव दिसून येतो,” असं ओबामा यांनी म्हटलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून २०१० साली आपण भारताला पहिल्यांदा भेट दिली. त्यापूर्वी आपण कधीही भारतामध्ये गेलो नव्हतो मात्र भारत देशाला माझ्या मनात कायमच विशेष स्थान होतं, असं ओबामा यांनी म्हटलं आहे.

No comments:

Post a Comment