Tuesday, 24 November 2020

७४ वर्षात पहिल्यांदाच बिहारच्या कॅबिनेटमध्ये नाही एकही मुस्लीम मंत्री.


🔰बिहारचे मुख्यमंत्री म्हणून सोमवारी नितीश कुमार यांनी सातव्यांदा शपथ घेतली. याचबरोबर यावेळी अन्य १४ मंत्र्यांना देखील शपथ देण्यात आली.  यानंतर परत एकदा बिहारमध्ये नितीशराज सुरू झालं. मात्र, यंदा प्रथमच बिहार कॅबिनेटमध्ये एकही मुस्लीम चेहरा नसल्याचं समोर आलं आहे. एवढच नाहीतर बिहारमधील सत्ताधारी एनडीएकडे मुस्लीम समाजाचा एकही आमदार नाही.


🔰सवातंत्र्यानंतर कदाचित असं पहिल्यांदाच होत असेल,की बिहारमधील सत्ताधारी आघाडी विधानसभेतील सत्तेच्या खुर्च्यांवर मुस्लीम आमदाराविना बसली आहे. टाईम्स नाऊने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.


🔰बिहारमधील एनडीएमध्ये भाजपा, जनता दल संयुक्त, हिंदुस्थान अवाम मोर्चा(सेक्युलर) व विकास इन्सान पार्टी या पक्षांचा समावेश आहे. तरी, यापैकी कोणत्याही एका पक्षाला मुस्लीम आमदाराला निवडून विधानसभेत पाठवता आलेले नाही. विशेष म्हणजे या राज्यात १६ टक्क्यांपेक्षा अधिक मुस्लीम लोकसंख्या आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...