जगभर आतापर्यंत सुमारे 10 लाख लोकांचा बळी घेणाऱ्या करोना विषाणूच्या प्रतिबंधाबाबत दिलासादायक माहिती फायझर कंपनीने सोमवारी दिली. कंपनीने तयार केलेली लस 90 टक्के परिणामकारक ठरू शकते, असे कंपनीने सांगितले.
तसेच फायझर आणि तिची जर्मन सहयोगी कंपनी बायोएनटेक यांनी ही लस संयुक्तपणे तयार केली आहे. ती 90 टक्के परिणामकारक ठरू शकेल, असे प्राथमिक निष्कर्ष असल्याचे फायझर कंपनीने सांगितले.
तर लशीचा उपयोग 16 ते 85 वयोगटातील लोकांवर तातडीने करण्यासाठी या महिनाअखेरीस अमेरिकेच्या नियंत्रकांकडे अर्ज करण्याचे संकेतही कंपनीने दिले आहेत.
No comments:
Post a Comment