Tuesday, 24 November 2020

भारताचा ‘परम सिद्धी’ जगातला 63 व्या क्रमांकाचा सर्वात शक्तिशाली महासंगणक.


🌹भारताच्या सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅडव्हान्स्ड कंप्यूटिंग" (C-DAC) येथे नॅशनल सुपरकंप्यूटिंग मिशन (NSM) अंतर्गत प्रस्थापित केलेल्या उच्च कामगिरी संगणन-कृत्रीम बुद्धिमत्ता (HPC-AI) महासंगणक “परम सिद्धि” याने जगातल्या अव्वल 500 सर्वात शक्तिशाली एकसंध संगणक प्रणालींच्या जागतिक क्रमवारीत 63 वा क्रमांक पटकावला आहे.


🧩ठळक बाबी....


🌹परम सिद्धी महासंगणक NVIDA डीजीएक्स सुपर पीओडी संदर्भ आर्किटेक्चर नेटवर्किंग व सी-डॅकच्या स्वदेशी विकसित HPC-AI इंजिन, सॉफ्टवेअर फ्रेमवर्क आणि क्लाऊड प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आले आहे. 


🌹ही प्रणाली सखोल शिक्षण, व्हिज्युअल संगणन, आभासी वास्तविकता, प्रवेगक संगणन तसेच ग्राफिक्स व्हर्च्युअलायझेशन अश्या प्रगत तंत्रामध्ये मदत करीत आहे.कृत्रीम बुद्धिमत्ता यंत्रणा प्रगत साहित्य, संगणकीय रसायनशास्त्र आणि खगोलशास्त्र यासारख्या क्षेत्रात विनियोगाच्या विकासाला बळकटी प्रदान करते.


🌹तयाद्वारे औषधाची रचना व प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा प्रणालीसाठी एका व्यासपिठाच्या अंतर्गत अनेक पद्धती विकसित केल्या जात आहेत तसेच मुंबई, दिल्ली, चेन्नई, पटना आणि गुवाहाटी सारख्या पूरग्रस्त मेट्रो शहरांसाठी पूर पूर्वानुमान पद्धती विकसित करण्यात येत आहेत. जलद सिमुलेशन, मेडिकल इमेजिंग, जीनोम सीक्वेन्सिंग आणि पूर्वानुमान या पद्धतींच्या माध्यमातून कोविड-19 विरूद्धच्या लढाईत संशोधन व विकासाला त्यामुळे गती प्राप्त झाली.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...