Tuesday, 24 November 2020

जल जीवन अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी 5 नव्या तंत्रांची मदत


🎲जलशक्ती मंत्रालयाच्या पेयजल व स्वच्छता विभागातल्या बहुशाखीय तांत्रिक समितीकडून पाच अभिनव तंत्रांची शिफारस करण्यात आली आहे. त्यापैकी पेयजल पुरविण्यासाठी तीन प्रकारच्या तर स्वच्छतेसाठी दोन तंत्रांची शिफारस करण्यात आली आहे.


♟शिफारस केलेले तंत्र....


🎲गरुंडफोस एक्युप्युअर - सौर ऊर्जेवर चालणारा जल शुद्धिकरण, जल प्रक्रिया प्रकल्पजनजल ‘वॉटर ऑन व्हील’ – ही इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT) तंत्रज्ञानाचा उपयोग करणारी यंत्रणा आहे, ज्यामार्फत वैश्विक स्थान प्रणालीने (GPS) सक्षम असलेल्या विजेरी वाहनाच्या माध्यमातून घरापर्यंत सुरक्षित पाणी पुरविले जाणार.

प्रीस्टो ऑनलाइन क्लोरिनेटर – हे पाण्यातील प्रदूषण दूर करून पाण्याच्या निर्जंतुकीकरणासाठी वापरले जाणारे विजेचा वापर न करणारे ऑनलाइन क्लोरिनेटर आहे.


🎲जॉकासौ तंत्रज्ञान – हे सांडपाणी, स्वयंपाकघर आणि स्नानासाठी वापरलेल्या पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी भूमिगत बसवले जाणारे एक अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे.एफबीटेक - या तंत्रज्ञानाच्या मदतीने विकेंद्रित सांडपाणी प्रक्रिया तंत्रज्ञान वापरून जलशुद्धी केले जाते.


♟पार्श्वभूमी...


🎲दशातल्या ग्रामीण भागामध्ये सन 2024 पर्यंत प्रत्येक घरामध्ये नळाद्वारे पेयजल पुरविण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे. या महत्वाकांक्षी अभियानाच्या अंमलबजीवणीमध्ये येणाऱ्या विविध समस्या सोडवत असताना जलशक्ती मंत्रालय अभिनव तंत्रांची मदत घेत आहे.


🎲पाणी योजनेचे काम करताना त्या विशिष्ट क्षेत्रामध्ये जल स्त्रोतांची उपलब्धता आणि जलस्तर त्याचबरोबर पाण्याची गुणवत्ता, जलपूर्ती आणि स्वच्छता यांच्यामध्ये समन्वय साधणे, तसेच अनेक ठिकाणी पाण्याचा रंग राखाडी असतो काही ठिकाणी पाण्यामध्ये गाळ साठलेला असतो, अशा विविध समस्यांची सोडवणूक करण्यासाठी राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना जलशक्ती मंत्रालयाकडून ऑनलाइन मदत देण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment