Thursday, 5 November 2020

​5 नोव्हेंबरला जागतिक गुंतवणूकदारांची आभासी गोलमेज परिषद भरणार

- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली दि. 5 नोव्हेंबर 2020 रोजी जागतिक गुंतवणूकदारांची आभासी गोलमेज परिषद (VGIR) आयोजित केली जाणार आहे.

- कार्यक्रमाचे आयोजन भारत सरकारच्या अर्थ मंत्रालय आणि राष्ट्रीय गुंतवणूक व पायाभूत सुविधा निधी (NIIF) यांच्यावतीने करण्यात आले आहे.

◾️ठळक बाबी

- परिषदेमध्ये जागतिक स्तरावरचे आघाडीचे संस्थात्मक गुंतवणूकदार, भारतातले मोठे व्यावसायिक आणि भारत सरकारमध्ये असलेले निर्णय घेणारे सर्वोच्च अधिकारी मंडळी आणि वित्तीय बाजार नियामक यांच्यामध्ये विशेष संवाद साधला जाणार आहे.

- जागतिक गुंतवणूकदारांव्यतिरिक्त परिषदेमध्ये भारतामधले प्रमुख व्यावसायिक, उद्योजकही सहभागी होणार आहेत.

- परिषदेत जगामध्ये सर्वात वरच्या स्थानावर असलेले वीस ‘पेन्शन’ आणि ‘वेल्थ फंड’चे संबंधित प्रतिनिधी सहभागी होणार आहे.

- या निधींच्यामार्फत जवळपास 6 लक्ष कोटी अमेरिकी डॉलर एवढ्या मालमत्तेचे व्यवस्थापन केले जाते.

- जागतिक निधी संस्थांचे कार्य आणि गुंतवणूकदार अमेरिका, युरोप, कॅनडा, कोरिया, जपान, मध्य पूर्व, ऑस्ट्रेलिया आणि सिंगापूर यासारख्या महत्वाच्या क्षेत्रांमध्ये विस्तारलेले आहेत.

- परिषदेत भारताची अर्थव्यवस्था आणि गुंतवणूकीविषयीचा दृष्टीकोन, संरचनात्मक सुधारणा आणि भारताची अर्थव्यवस्था 5 लक्ष कोटी रुपयांपर्यंत नेण्यासाठी सरकार कशा पद्धतीने कार्य करीत आहे, यावर लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment