Wednesday, 4 November 2020

मिशन सागर-2”: INS ऐरावत सुदान बंदरामध्ये दाखल.


🔰भारतीय नौदलाने चालविलेल्या ‘मिशन सागर-2’चा एक भाग म्हणून INS ऐरावत हे जहाज अन्नधान्य घेऊन 2 नोव्हेंबर 2020 रोजी सुदान बंदरामध्ये दाखल झाले.


🔰या मोहिमेमध्ये भारत सरकारच्या वतीने आपल्या मित्र देशांना नैसर्गिक आपत्ती आणि कोविड-19 महामारीच्या काळात अन्नधान्याची मदत करण्यात येत आहे. सुदानच्या जनतेसाठी भारताने दिलेल्या 100 टन अन्नधान्याची मदत INS ऐरावतमार्फत पाठविण्यात आली आहे.


🔴पार्श्वभूमी...


🔰‘मिशन सागर-2’ मोहिमेच्या पहिल्या टप्प्याला मे-जून 2020 मध्ये प्रारंभ झाला. त्यानुसार भारताने मालदीव, मॉरिशस, सेशेल्स, मेदागास्कर आणि कोमोरोस येथे अन्नधान्याची आणि औषधांची मदत पाठविण्यात आली. याचा भाग म्हणून भारतीय नौदलाच्या ऐरावत जहाजामार्फत सुदान, दक्षिण सुदान,  जिबुती आणि इरिट्रिया देशाकडे मदत पाठविण्यात आली आहे.


🔰आपल्या सागरी शेजारी देशांबरोबर चांगले संबंध प्रस्थापित करण्यासाठी आणि मित्रत्वाचे नाते अधिक दृढ करण्यासाठी त्या देशांना संकटकाळामध्ये मदत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीतून ‘मिशन सागर-2’ हे अभियान सुरू करण्यात आले आहे. संरक्षण मंत्रालय आणि परराष्ट्र कल्याण मंत्रालय यांच्या समन्वयातून ही मोहीम पार पाडण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...