🅾️‘आरसेप’ म्हणजे प्रादेशिक सर्वंकष इकॉनॉमिक पार्टनरशिप) करारावर आशिया—पॅसिफिकमधील चीनसह पंधरा प्रमुख देशांनी स्वाक्षरी केली आहे.तर हा आतापर्यंतचा सर्वात मोठा व्यापार करार मानला जात आहे.
🅾️‘आसियान’ (‘असोसिएशन ऑफ साउथ इस्ट एशियन नेशन्स’) देशांच्या वार्षिक परिषदेच्यावेळी रविवारी या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
🅾️करोनामुळे बिघडलेली आर्थिक स्थिती सावरण्यासाठी या देशांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या असून भारत व अमेरिका मात्र त्यापासून दूर राहिले आहेत.
🅾️जागतिक सकल राष्ट्रीय उत्पन्नात या देशांचा वाटा 30 टक्के आहे. 2012 मध्ये आरसेप कराराची संकल्पना मांडली गेली होती. या करारावर आग्नेय आशिया शिखर बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले असून त्यामुळे करोनाचा फटका बसलेल्या अर्थव्यवस्थांना सावरण्याची संधी मिळणार आहे.
No comments:
Post a Comment