⛔️17 नोव्हेंबर 2020 रोजी 12 वी ‘BRICS शिखर परिषद’ आभासी माध्यमातून पार पाडण्यात आली. “वैश्विक स्थिरता, सामायिक सुरक्षा आणि अभिनव वाढीसाठी BRICS भागीदारी” या विषयाखाली BRICS नेत्यांनी यावर्षी चर्चा केली.
⛔️यावर्षी परिषदेचे अध्यक्षपद रशियाकडे होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचे प्रतिनिधीत्व केले.
💮BRICS समूहाबद्दल...
⛔️BRICS हा ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या पाच राष्ट्रांचा समूह आहे. 2006 साली समूहाची स्थापना झाली. 2011 साली BRIC समुहात दक्षिण आफ्रिकेचा समावेश करण्यात आला आणि समूहाला BRICS हे नाव दिले गेले. BRICS देशांमधले द्विपक्षीय संबंध प्रामुख्याने हस्तक्षेप-मुक्त, समानता आणि परस्पर लाभाच्या आधारे प्रस्थापित केले जातात.
⛔️रशियाच्या येकतेरिनबर्ग शहरात दिनांक 16 जून 2009 रोजी BRIC समूहाची पहिली औपचारिक परिषद आयोजित करण्यात आली होती. 2009 सालापासून BRICS राष्ट्रे औपचारिक परिषदेत दरवर्षी भेट घेतात.
No comments:
Post a Comment