Saturday, 31 October 2020

सिक्युअर अप्लिकेशन फॉर द इंटरनेट (SAI) अॅप: भारतीय भुदलाकडून वापरले जाणारे मेसेजिंग अप्लिकेशन


🔰भारतीय भुदलाने “सिक्युअर अप्लिकेशन फॉर इंटरनेट (SAI)” नामक एक सुरक्षित मेसेजिंग अॅप विकसित केला आहे.


🔰अप इंटरनेटच्या माध्यमातून अँड्रॉइट मंचासाठी सुरक्षित दूरध्वनी, संदेश आणि व्हिडिओ कॉलिंग सेवा प्रदान करते.


🔰त मॉडेल वॉट्सअप, टेलिग्राम, संवाद (SAMVAD) आणि GIMS या सारख्या व्यावसायिकरित्या उपलब्ध असलेल्या मेसेजिंग अप्लिकेशन सारखे असुन ते एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शन मेसेजिंग पद्धतीचा अवलंब करते.


🔰सवेच्या काळात सुरक्षित मेसेजिंग पद्धत सुलभ करण्यासाठी संपूर्ण भुदलात SAI अॅपचा वापर केला जाणार आहे.


🔴भारतीय भुदलाविषयी...


🔰भारतीय लष्कराचा पायदळ विभाग म्हणजेच भारतीय भुदल हा भारतीय सशस्त्र सेनेचा एक मोठा घटक आहे. दलाची स्थापना 15 ऑगस्ट 1947 रोजी झाली.


🔰दलाची संरचना: तीनही सेनादलांचे प्रमुख राष्ट्रपती हेच असतात. भूसेनाध्यक्ष (चीफ ऑफ आर्मी स्टाफ) व त्याखाली उप (व्हॉइस) भूसेनाध्यक्षांचे स्थान असते. देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने देशाचे सात कक्ष (कमांड) पाडले असून त्या प्रत्येकावर लेफ्टनन्ट जनरलच्या हुद्याचा अधिकारी प्रमुख (आर्मी कमांडर) असतो.


🔰भदलाची जबाबदारी: भारताच्या भूमीचे परकीय आक्रमणापासून संरक्षण करणे, देशात कायदा व सुरक्षा राखण्याकरीता सरकारला मदत करणे व आपत्काली नागरिकांना साहाय्य करणे

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...