✅आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करणाऱ्या नॅशनल मेडिसिनल प्लांट बोर्ड (NMPB) यांनी आयुर्वेद, सिद्ध, युनानी आणि होमिओपॅथी औषध प्रणालींमध्ये वापरल्या जाणार्या कच्च्या औषधांच्या संदर्भात प्रदेशनिहाय रिजनल रॉ ड्रग रिपॉझिटरी (RRDR) यांची स्थापना करण्याची योजना तयार केली आहे.
🔴रिजनल रॉ ड्रग रिपॉझिटरी (RRDR) उभे करण्यामागची मुख्य उद्दिष्टे
✅परत्येक प्रदेशात उपलब्ध असणाऱ्या आणि वापरल्या जाणार्या कच्च्या औषधी मालाचे एक संग्रह केंद्र म्हणून कार्य करणे.
कच्च्या औषधांच्या प्रमाणीकरणासाठी अधिकृत संदर्भ साठा म्हणून कार्य करणे.
✅हर्बल उद्योगांमध्ये वापरल्या जाणार्या कच्च्या औषधाच्या प्रमाणीकरणासाठी मानक शिष्टाचार प्रस्थापित करणे.
✅कच्च्या औषधांच्या उपयुक्ततेबद्दल सामान्य जागरूकता पसरविण्यासाठी शैक्षणिक केंद्र म्हणून कार्य करणे.
प्रस्तावित RRDR
✅हिमालयी विभाग (उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू व काश्मीर).
✅पश्चिम विभाग (पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, गुजरात)
✅उत्तर विभाग (उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड)
मध्य विभाग (मध्यप्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगड).
✅पर्व विभाग (पश्चिम बंगाल, ओरिसा, सिक्कीम)
✅पर्वोत्तर विभाग (आसाम, अरुणाचल प्रदेश, मेघालय, मिझोरम, नागालँड, त्रिपुरा, मणीपूर).
✅दक्षिणी (अ) विभाग (कर्नाटक, गोवा, आंध्रप्रदेश, तेलंगणा).
✅दक्षिणी (ब) आणि बेट विभाग (तामिळनाडू, केरळ, पांडिचेरी, अंदमान आणि निकोबार.
No comments:
Post a Comment