Thursday, 22 October 2020

राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम (NCAP)

⛑जानेवारी 2019 मध्ये वायु प्रदूषणाविरोधी लढ्याच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम (NCAP) याची घोषणा केली होती.


⛑भारतातली हवेची गुणवत्ता 2024 सालापर्यंत 20 ते 30 टक्क्यांनी अधिक स्वच्छ करण्याचे लक्ष ठेवले गेले आहे.


⛑सन 2017 ते सन 2024 या कालावधीत कमीतकमी 102 शहरांमधल्या पार्टीकुलेट मॅटर (PM) या प्रदूषकाचे प्रदूषण 20 ते 30 टक्क्यांनी कमी करण्याचा भारत सरकारच्या राष्ट्रीय स्वच्छ वायू कार्यक्रमाचा उद्देश आहे.

कार्यक्रमाची अंमलबजावणी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ (CPCB) करीत आहे.

एका अभ्यासानुसर, भारतातल्या लोकांचे आयुर्मान खराब हवेच्या गुणवत्तेमुळे तब्बल 5 वर्षांनी कमी होत आहे.


🅾️हवा प्रदूषण


⛑परकृती निकोप राखण्यासाठी मानवाला सकस आहाराबरोबर स्वच्छ आणि शुध्द हवेची आवश्यकता आहे. हवेतल्या प्रदूषणाचा परिणाम मानवी जीवनाबरोबरच वनस्पती आणि इतर जीवसृष्टीवर होतो. प्राणवायू म्हणजेच ऑक्सिजन हा हवेतला महत्त्वाचा घटक आहे. हवेत ऑक्सिजनचे प्रमाण 21 टक्के असते. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे सर्वप्रथम मेंदूवर आघात होतो. विषारी अथवा अविषारी वायू केवळ आपल्या आस्तित्वाने हवेतला ऑक्सिजन कमी करतात.


⛑परदूषणास चार घटक जबाबदार आहेत - चालू नैसर्गिक स्थिती, मानवी लोकवस्ती, उत्पादनाची आणि खपाची पातळी, आणि तंत्रज्ञानाचा उपयोग. लाकूड, कोळसा, पेट्रोलियम पदार्थ यांच्या ज्वलनामुळे सल्फर डायक्साईड, कार्बन मोनोक्साईडन, नायट्रोजन ऑक्साईड हे प्रमुख प्रदूषके तयार होतात.


⛑वायू प्रदूषणामुळे मानवाला श्वसनाचे आणि फुफ्फूसाचे आजार होतात. त्याचप्रमाणे दमा, कर्करोग, बेशुध्द पडणे, घसा खवखवणे, डोळ्यातून पाणी येणे इ. विकार होतात. वनस्पतींच्या बाबतीत त्यांची वाढ खुंटणे, पाने वाळणे, वाकणे, झाड मरून जाणे किंवा उत्पन्न कमी येणे इत्यादी परिणाम होतात. तसेच वातावरणातले तापमान वाढते व त्याचा परिणाम हवामानावर तसेच पावसावर होतो.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...