Thursday, 29 October 2020

चंद्रावर पाणी सापडल्याचा NASAचा दावा.


🔰चंद्रावर पाणी सापडल्याचा दावा NASA ने केला  आहे. चंद्रावर पाणी सापडलं आहे नासाच्या सोफिया हवाई वेधशाळेद्वारे आम्ही ते पहिल्यांदाच शोधलं आहे असंही नासाने म्हटलं आहे.


🔰अमेरिकेच्या नासा या अंतराळ संशोधन संस्थेने सोमवारी आपल्या नव्या शोधाबाबत माहिती दिली आहे. एवढंच नाही तर आता नासाने दोन अंतराळवीरांनाही 2024 पर्यंत चंद्र मोहिमेवर पाठवण्याचाही निर्णय घेतला आहे.


🔰तसेच जे दोन अंतराळवीर चंद्रावर जातील त्यापैकी एक पुरुष आणि एक महिला अंतराळवीर असेल असंही नासाने सांगितलं आहे. चंद्रावर पाणी सापडल्याच्या शोधाने आता नासाच्या चांद्रयान मोहिमेला बळ मिळालं आहे.

चंद्राच्या सूर्यप्रकाशित भागातही पाणी असल्याचा शोध सोफिया या हवाई वेधशाळेने लावला आहे.


🔰 चद्राच्या फक्त ध्रुवीय आणि अंधाऱ्या प्रदेशापुरते पाण्याचे अस्तित्व मर्यादित नाही. चंद्राच्या पृष्ठभागावर सर्वत्र पाण्याचे अंश असल्याचे या शोधातून सुचित करण्यात आले आहे.


सूर्याचा प्रकाश पडत असलेल्या चंद्राच्या पृष्ठभागावर पाणी आहे.


🔰 NASA

सूर्याचा प्रकाश पडत असलेल्या चंद्राच्या पृष्ठभागावर पाणी असल्याचे अमेरिकेच्या नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिसट्रेशन (NASA) या अंतरराळ संशोधन संस्थेनी प्रथमच जाहीर केले.


🔰NASAच्या ‘स्ट्रॅटोस्फेरिक ऑब्झर्व्हेटरी फॉर इन्फ्रारेड ॲस्ट्रॉनॉमी’ (सोफिया) नामक वेधशाळेतून चंद्रावरील प्रकाशित भागात पाणी असल्याची घोषणा करण्यात आली. ‘सोफिया’ ही जगातली सर्वात मोठी विमानामध्ये स्थापित एक वेधशाळा आहे. बोइंग 747 या विमानात बदल करून ही उंच आकाशात उडणारी वेधशाळा तयार करण्यात आली आहे. त्याद्वारे केलेल्या निरीक्षणांवरून चंद्रावरील पाण्याबाबत निष्कर्ष काढण्यात आला आहे. त्यानुसार, चंद्राच्या दक्षिण गोलार्धातल्या क्लेव्हीयस दरीत पाणी असल्याचे आढळले आहे.


🔴ठळक बाबी....


🔰पथ्वीवरून कधीही न दिसणाऱ्या, चंद्राच्या कायम सावली असलेल्या भागात पाणी असल्याचे पुरावे मिळाले होते. मात्र, आता प्रथमच सूर्यप्रकाशित भागातही पाणी असल्याचे पुरावे मिळाले आहेत. सूर्याच्या थेट प्रकाशात चंद्रावर पाणी टिकून राहणे अशक्य असल्याचे शास्त्रज्ञांचे यापूर्वी मत होते.


🔰निष्कर्षानुसार, चंद्रावर पाणी प्रवाही नसून रेणूंच्या स्वरूपात आणि गोठलेल्या अवस्थेत आहे. सौर वादळे किंवा लघुग्रहांद्वारे चंद्रावर पाणी आले असण्याची शक्यता आहे. प्रत्येक चौरस मीटरमध्ये 350 मिलिलिटर पाणी असल्याचा अंदाज आहे. चंद्रावर 15 हजार चौरस मैलांवर पाणी असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.


🔰अल्प प्रमाणात असूनही, या शोधामुळे चंद्राच्या पृष्ठभागावर पाणी कसे तयार होते हा सर्वात मोठा प्रश्न निर्माण होतो तसेच चंद्राच्या कठीण आणि हवारहित वातावरणात पाणी कसे टिकून राहते हा देखील एक प्रश्न आहे.

No comments:

Post a Comment