Monday, 20 May 2024

भारतीय कर संरचना (Indian Tax Structure)

व्याख्या :- "जनतेच्या कल्याणासाठी शासनाला करावा लागणारा खर्च भागविण्याच्या हेतूने शासनाने लोकांकडून सक्तीने घेतलेली रक्कम म्हणजे कर होय."

• घटनेच्या कलम २६५ अंतर्गत सरकारला कर आकारण्याचा अधिकार आहे.


🔶परत्यक्ष कर :- 

प्रत्यक्ष कर म्हणजे असे कर की ज्यांच्या बाबतीत कायदेशीरपणे ज्या व्यक्तीवर कर लादलेला असतो तीच व्यक्ती कर भरत असते & करांचे ओझेही त्याच व्यक्तीला सहन करावे लागते.  प्रत्यक्ष करांचे ओझे दुस-या व्यक्तीकडे संक्रमित करता येत नाही.


🔶अप्रत्यक्ष कर :- 

अप्रत्यक्ष कर म्हणजे असे कर की ज्यांच्या बाबतीत कराचा आघात (impact of tax)  आणि करभार (incidence of tax) वेगवेगळ्या व्यक्तीवर पडत असतो.  अंतिम करभार ग्राहकावर पडत असतो.


🔶परमाणशीर कर :-

 जर दायित्व (tax-liability) उत्पन्नातील वाढीच्या सम प्रमाणात वाढत असेल तर त्या करास प्रमाणशीर कर असे म्हणतात.उदा., महामंडळ कर.


🔶परगतिशील कर :-

जर करदायित्व उत्पन्नातील वाढीच्या अधिक वेगाने वाढत असेल तर त्या करास प्रगतिशील कर असे म्हणतात.उदा., वैयक्तिक आयकर.


🔶परतिगामी कर :- 

उत्पन्न वाढत असतानाही जर कर दायित्वाचे उत्पन्नाशी असलेले प्रमाण कमी होत असेल तर त्या करास प्रतिगामी  कर असे म्हणतात.


🔶विशिष्ट आणि मुल्यानुसारी कर :- 

जर कर वस्तूंच्या किंवा आकारमानाच्या एककानुसार (per unit of weight or volume) आकारला असेल तर त्यास विशिष्ट कर असे म्हणतात.

जर कर वस्तूंच्या किंमतीच्या प्रमाणात  (as percentage of value of goods) आकारला जात असेल तर त्यास मूल्यानूसारी कर असे म्हणतात.


🔶एकमूखी & बहुमूखी कर :- 

जर कर व्यवस्थेत एकच कर आकारला जात असेल तर त्यास एकमुखी कर पध्दती म्हणतात.जर कर व्यवस्थेत अनेक कर आकारले जात असतील तर त्यास बहुमुखी कर पध्दती असे म्हणतात.


🔶महामंडळ कर/निगम कर (Corporation Tax) :- 

कंपन्यांच्या / उत्पादन संस्थाच्या उत्पन्नावर / नफ्यावर जो कर आकारला जातो त्याला महामंडळ कर असे म्हणतात.केंद्र सरकार मोठ्या तसेच लहान कंपन्यावर आकारते.सध्या (२०१२-१३) भारतीय कंपन्यासाठी महामंडळ कर त्यांच्या निव्वळ नफ्याच्या ३०% तर परकीय कंपन्यासाठी ४०% इतक्या दराने आकारला जातो.


🔶किमान पर्यायी कर (Minimum Alternate Tax : MAT ) :- 

हा कर महामंडळ कराशी संबंधित कर आहे.  ज्या कंपन्या आपल्या जमा-खर्चात मोठा नफा दाखवतात, मात्र विविध कर सवलती, कर कपात, कर प्रोत्साहने इत्यादीमुळे कराच्या जाळ्यातुन सुटतात अशा कंपन्यावर MAT आकारला जातो. 

MAT हा कर १९९६-९७ च्या अर्थसंकल्पापासून आकारण्यात येतो.

२०११-१२ च्या अर्थसंकल्पात या कराता दर १८.५% इतका करण्यात आला आहे.


No comments:

Post a Comment

Latest post

Eklavya

विद्या प्रबोधिनी कोल्हापूर : CLICK HERE राष्ट्रनिर्माण प्रबोधनी : CLICK HERE स्पर्धाशाही acadeny : CLICK HERE रयत प्रबोधनी : CLICK HERE सारथ...