🛑 16 वी घटनादुरुस्ती 1963 :
राज्यसंस्थेला भारताचे सार्वभौमत्व आणि अखंडता यांच्या हितार्थ भाषण आणि अभिव्यक्ती, शांततापूर्व एकत्र जमणे आणि संघटना, संस्था स्थापन करणे या मूलभूत हक्कांवर आणखी निर्बंध लादण्याचे अधिकार प्रदान.
कायदेमंडळाला निवडणूक लढविणारे उमेदवार कायदेमंडळाच्या सदस्य, मंत्री, न्यायाधीश आणि भारताचे महालेखापरीक्षक यांनी करावयाच्या सत्य विधान आणि शपथेच्या प्रारूपामध्ये सार्वभौमत्व आणि अखंडता यांचा समावेश.
🛑 17 वी घटनादुरुस्ती 1964 :
बाजारभावाप्रमाणे नुकसानभरपाई दिल्या शिवाय व्यक्तिगत लागवडीखालील असलेली जमीन प्राप्त करण्यास प्रतिबंध. ९व्या परिशिष्टामध्ये आणखी ४४ कायद्यांचा समावेश.
🛑18 वी घटनादुरुस्ती 1966 :
एखाद्या घटक राज्याच्या किंवा केंद्रशासित प्रदेशाचा एखादा भाग दुसऱ्या एखाद्या घटकराज्याला किंवा केंद्रशासित प्रदेशाला जोडून नवीन घटकराज्य किंवा केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्याचा संसदेचा हा अधिकार तिच्या नवीन घटकराज्य निर्माण करण्याच्या अधिकारा मध्ये अंतर्भूत आहे.
🛑19वी घटनादुरुस्ती 1966 :
निवडणूक न्यायासनाची व्यवस्था रद्द केली आणि निवडणूक याचिका सुंवैचा अधिकार उच्च न्यायालयांना दिला.
🛑 20वी घटनादुरुस्ती 1966 :
सर्वोच्च न्यायालयाने अवैध घोषित केलेल्या उत्तर प्रदेशातील जिल्हा न्यायाधीशांच्या विशिष्ट नियुक्त्यांना वैध ठरविल्या
No comments:
Post a Comment