Wednesday, 21 October 2020

प्लाझ्मा थेरपी परिणामकारक नाही, बंद करण्याचा विचार सुरू; ICMRची महत्त्वाची माहिती.


🔰करोना रुग्णांवर करण्यात येणारी प्लाझ्मा थेरपीबद्दल (रक्तद्रव्य उपचार पद्धती) अखिल भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं आज महत्त्वाची माहिती दिली. करोना रुग्णांसाठी प्लाझ्मा थेरपी परिणामकारक नाही. मृत्यू दर रोखण्यात ही उपचार पद्धती यशस्वी ठरलेली नाही, त्यामुळे ती उपचाराच्या यादीतून वगळण्याचा विचार सुरू आहे, अशी माहिती आयसीएमआरचे बलराम भार्गवा यांनी आज दिली.


🔰आयसीएमआरचे अध्यक्ष बलराम भार्गवा यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. प्लाझ्मा थेरपीविषयी बोलताना भार्गवा म्हणाले,’अनेक अभ्यासाच्या निष्कर्षात असं दिसून आलं आहे की, करोनामुळे होणारा मृत्यू दर रोखण्यात प्लाझा थेरपी फारशी परिणामकारक ठरली नसल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे करोना रुग्णांसाठी ठरवण्यात आलेल्या राष्ट्रीय आरोग्य उपचार प्रोटोकॉलमधून ती वगळ्याचा विचार सुरू आहे,” असं भार्गवा यांनी सांगितलं.


🔰करोनाचा शिरकाव झाल्यानंतर रुग्णांवर प्लाझ्मा थेरपी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ही उपचार पद्धती फायदेशीर असल्याचं सुरूवातीला सांगण्यात आलं होतं. मात्र, त्यावर नंतर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. यापूर्वी आयसीएमआरनं प्लाझ्मा थेरपीच्या परिणामांवर प्रश्न उपस्थित केले होते. करोना उपचारांमध्ये प्लाझ्मा थेरपी ऐवजी अँटिसेरा (प्राणी रक्तद्रव्य चाचणी) या पर्यायाचा वापर केला जाईल, असं म्हटलं होतं.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...