Sunday, 4 October 2020

हवामानदृष्ट्या स्मार्ट शहर मूल्यांकन आराखडा (CSCAF 2.0).


 केंद्रीय गृहनिर्माण व नगरविकास मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या हस्ते 11 सप्टेंबर 2020 रोजी “हवामानदृष्ट्या स्मार्ट शहर मूल्यांकन आराखडा 2.0 (क्लायमेट स्मार्ट सिटीज अॅसेसमेंट फ्रेमवर्क –CSCAF 2.0) तसेच ‘स्ट्रीट फॉर पीपल’ आव्हान अश्या दोन उपक्रमांचे उद्घाटन करण्यात आले.


✔️ CSCAF 2.0 विषयी ठळक बाबी...


मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेला ‘स्मार्ट शहर अभियान’ CSCAF 2.0 कार्यक्रम राबवित आहे.


CSCAFचा उद्देश - हवामान बदलाचा सामना करण्यासाठी एक निश्चित आणि ठोस आराखडा तयार करणे तसेच त्याचे नियोजन आणि अंमलबजावणीची योजना आखणे, त्यासाठीच्या गुंतवणुकीचा अंदाज घेणे.


या आराखड्यात 28 निदर्शकांसह पाच मुख्य क्षेत्रे आहेत - ऊर्जा आणि हरित इमारती; नगरनियोजन, हरितक्षेत्र आणि जैवविविधता; दळणवळण आणि हवेची गुणवत्ता; जलव्यवस्थापन; आणि घनकचरा व्यवस्थापन.या योजनेच्या अंमलबजावणीसाठी राष्ट्रीय नगरविकास संस्थेनेही CSCAFच्या अंमलबजावणीला मंजुरी दिली आहे.


‘स्ट्रीट फॉर पीपल’ आव्हान शहरी रस्ते चालण्यास सुलभ करण्यासाठी आणि पादचाऱ्यांसाठी अधिक सुरक्षित करण्यासाठी उपाययोजना करण्याविषयीचे आव्हान आहे. याचा उद्देश आपल्या शहराला जलद, अभिनव आणि कमी खर्चात होणारी व्यवस्था विकसित करण्यासाठी प्रेरणा देणे आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...