🔰१) विखंडन (Fission):
ज्या पद्धतीमध्ये एक सजीव पेशींचे दोन किंवा अधिक सामान भागात विभाजन होते. त्यास विखंडन असे म्हणतात. दोन सामान भागात विभाजन झाल्यास त्या क्रियेला द्विविखंडन (Binary Fission) आणि अधिक भागात विभाजन झाल्यास त्या बहुविखंडन (Multiple Fission) असे म्हणतात. हि पद्धत एकपेशीय सजीवांमध्ये आढळते.
उदा. द्विविखंडन – जिवाणू, पॅरामेशिअम (आडवे विखंडन), बहुविखंडन – अमिबा, यूग्लिना (उभे विखंडन).
🔰२) मुकुलायन (Budding):
बहुपेशीय सजीवांची पूर्ण वाढ झाल्यानंतर त्यांच्या शरीरावर गोलाकार फुगीर रचना तयार होते त्यास मुकुल असे म्हणतात. त्यात वाढ होऊन विकसित सजीव तयार होतो जेव्हा त्या सजीवामध्ये स्वतःचे पोषण करण्याची क्षमता निर्माण होते, तेव्हा तो मूळ सजीवापासून वेगळा होतो यास मुकूलायन असे म्हणतात. उदा. हायड्रा.
🔰३) खंडीभवन (Fragmentation):
काही बहुपेशीय सजीवांचे अनेक लहान तंतुमय खंडात रूपांतर होते . पाणी व पोषद्रव्ये योग्य प्रमाणात मिळाल्यावर त्यांची वाढ होऊन नवीन सजीव तयार होतात या पद्धतीला खंडीभवन असे म्हणतात. उदा स्पायरोगायरा.
🔰४) पुनरुदभवन / पुनर्जनन (Regeneration):
काही बहुपेशीय प्राण्यांमध्ये त्यांच्या शरीरापासून वेगळ्या झालेल्या भागापासून ते पूर्ण शरीर तयार करतात यालाच पुनरुदभवन असे म्हणतात.
उदा. प्लेनेरिया, लिव्हरफ्ल्यूक.
🔰५) बीजाणू निर्मिती (Spore Formation):
काही सजीवांमध्ये लहान पानांवर बीजाणूधानी तयार होते व त्यात असंख्य बीजाणू तयार होतात. बिजानुधानी परिपकव झाल्यानंतर फुटते व त्यातील बीजाणू अनुकूल परिस्थितीत नवीन सजीवांची निर्मिती करतात, यास बीजाणू निर्मिती असे म्हणतात.
उदा. म्युकर, मॉस, रिक्सीया तसेच काही नेचे गटातील वनस्पती.
🔰६) शाकीय प्रजनन (Vegetative Propagation):
वनस्पतींच्या मूळ, खोड, पाने, मुकुल यांसारख्या शाकीय अवयवांपासून होणाऱ्या प्रजननाला शाकीय प्रजनन असे म्हणतात.
उदा. खोड – बटाटा, बीट, ऊस, अद्रक, गुलाब इ.
मूळ- रताळे, गाजर, मुळा
पाने – ब्रायोफाटा (पानफुटी).
No comments:
Post a Comment