Tuesday, 13 October 2020

अत्योदय दिवस


- २५ सप्टेंबर रोजी साजरा, दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना याच दिवशी २५ सप्टेंबर २०१४ रोजी सुरुवात केल्याच्या निमित्ताने! तसेच२५ सप्टेंबर हा दीनदयाळ उपाध्याय यांचा जन्मदिवसही आहे.


🔸 २६ सप्टेंबर- आंतरराष्ट्रीय सर्वंकष अण्वस्त्र निर्मूलन दिवस

🔸 भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी(NDA) मधून शिरोमणी अकाली दल बाहेर पडला.

- यापूर्वी NDA मधून तेलुगु देसम पक्ष व शिवसेना हे प्रमुख पक्ष बाहेर पडले आहेत.


🔸 शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार २०२०

- विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी, ४५ पेक्षा कमी वय असलेल्या शास्त्रज्ञांना.

- पुण्यातील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा(NCL) येथील डॉ. अमोल कुलकर्णी(यांच्या नावे ३५ वेगवेगळी पेटंट आहेत), डॉ सुर्येंदू दत्ता, डॉ यू के आनंद वर्धनन, डॉ किंशुक दासगुप्ता


🔸 एस पी बालसुब्रह्मण्यम ('बालू')(७४) निधन

- कोविड-१९ संसर्गामुळे मृत्यू.

- वेगवेगळ्या १६ भाषेतील ४० हजारांपेक्षा जास्त गाणी गायली.

- पद्मश्री व पद्मभूषण पुरस्कार, ६ वेळा उत्कृष्ट गायक राष्ट्रीय पुरस्कार, १ फिल्मफेअर

- 'श्री श्री मर्यादा रामन्ना' हा पहिला चित्रपटासाठी पार्श्वगायन, तर हिंदीमधील 'एक दुजे के लिये' हा पहिला चित्रपट ठरला.


🔸 राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून "डॉ. एस सी शर्मा" यांची नियुक्ती.


🔸 "पॉझिटिव्ह पे सिस्टीम"

- मोठ्या रकमेच्या चेकसाठी १ जानेवारी २०२१ पासून RBI ही प्रणाली लागू करणार आहे.

- ५० हजार ते ५ लाखांपर्यंत रकमेसाठी ऐच्छिक तर ५ लाखांच्या पुढील चेकसाठी मात्र बंधनकारक असेल

- यात चेक वटण्यापूर्वी चेकसंबंधी तपशील बँक खातेदाराकडून जाणून घेईल.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...