Sunday, 17 March 2024

भारत सरकार कायदा, १८५८

- भारताच्या सुशासनासाठीचा कायदा म्हणून संबोधल्या जाणाऱ्या कायदा 

- ईस्ट इंडिया  कंपनीची राजवट संपुष्टात आणली 


कायद्याची वैशिष्ट्ये 

- यापुढे भारताचे सरकार राणीच्या नावाने राणीद्वारा चालविण्यात येईल अशी तरतूद

- भारताच्या गव्हर्नर जनरलच्या पदाचे नाव भारताचा व्हाईसराॅय असे बदलण्यात आले हा ब्रिटिश राजपराण्याचा भारतातील थेट प्रतिनिधी असणार होता. 

- लार्ड कॅनिंग हा भारताचा पहिला व्हाइसरॉय बनला.

- नियामक मडळ आणि संचालक मंडळ विसर्जित करून दुहेरी शासनाची पद्धत करण्यात आली.


- भारतीय प्रशासनावर नियंत्रणासाठी पूर्ण अधिकार असलेले भारतमंत्री असे नवे पद निर्माण करण्यात आले. 

- भारत मंत्री ब्रिटिश मंत्रिमंडल सदस्य होता व अंतिमत: ब्रिटिश संसदेला उत्तरदायी होता.


- भारतमंत्र्याला त्याच्या कामात मदत करण्यासाठी भारतमंत्री अध्यक्ष असलेले सल्लागार स्वरूपाचे १५ सदस्य 'इंडिया कौन्सिल' ची स्थापना 

- कायद्याने मोठे बदल केले गेले नाहीत

No comments:

Post a Comment