Thursday, 1 October 2020

काळ्या पैशांचा स्रोत बंद.


🔰शतकऱ्यांना मिळणारे स्वातंत्र्य काही लोकांना (अडते-दलाल) बघवत नाही. त्यांचा काळा पैसा जमा करण्याचा आणखी एक मार्ग बंद झाला आहे. म्हणून ते शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केली.


🔰वादग्रस्त शेती कायद्यांविरोधात शेतकरी संघटनांचे आंदोलन कायम आहे. दिल्लीमध्ये इंडिया गेटजवळ पंजाब युवा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ट्रॅक्टर जाळून निषेध केला. या घटनेच्या संदर्भात मोदी म्हणाले की, शेती कायद्यांना विरोध करणारे यंत्रांना आग लावून निषेध करत असून ते शेतकऱ्यांचा अपमान करत आहेत. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात शेतकरी, कामगार, आरोग्यसेवक अशा विविध समाजघटकांच्या हितांचे कायदे केले गेले असून त्यातून त्यांचा फायदाच होणार आहे. पण निव्वळ विरोध करायचा असे ठरवून काही लोक या कायद्यांना विरोध कसा करतात हे देशाने पाहिले असल्याची टिप्पणी मोदी यांनी केली.


🔰इडिया गेटनजीक ट्रॅक्टर जाळण्याची जबाबदारी घेणारे पंजाब युवा काँग्रेसचे अध्यक्ष ब्रिंदर धिल्लाँ याना चौकशीसाठी मंगळवारी पोलिसांनी ताब्यात घेतले. अन्य पाच जणांना अटक करण्यात आली आहे. मोदींनी पुन्हा एकदा हमीभावाची हमी दिली. शेतीमालाला हमीभाव दिला जाईल. शिवाय, शेतकऱ्यांना शेतीमाल विकण्याचेही स्वातंत्र्य असेल. हे स्वातंत्र्य काही लोकांच्या हितसंबंधांच्या आड येत असल्याचे मोदी म्हणाले.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...