Thursday, 22 October 2020

चालू घडामोडी चे प्रश्न व उत्तरे


Q1) पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेला CANI प्रकल्प कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?

उत्तर :-  सबमरीन ऑप्टिकल फायबर केबल


Q2) कोणत्या राज्याने ‘इंदिरा वन मितान योजना’ लागू केली?

उत्तर :- छत्तीसगड


Q3) कोणत्या संस्थेनी वायू गुणवत्तेच्या संदर्भात व्यवस्थापनासाठी GIS-आधारित व्यासपीठ तयार करण्यासाठी बिहार राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळासोबत करार केला?

उत्तर :-  भारतीय तंत्रज्ञान संस्था, दिल्ली


Q4) नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईन (NIP) याच्या संदर्भातले इंडिया इन्वेस्टमेंट ग्रीड (IIG) व्यवस्था कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत येते?

उत्तर :-  वाणिज्य व उद्योग मंत्रालय


Q5 'सुरक्षा’ या नावाचे राष्ट्रीय संकेतस्थळ मानवाचा कोणत्या प्राण्याशी संघर्ष टाळण्याच्या संदर्भात आहे?

उत्तर :- हत्ती


Q6) भारत आणि कोणत्या देशाच्या दरम्यान IC-IMPACTS वार्षिक संशोधन परिषद आयोजित केली जाते?

उत्तर :- कॅनडा


Q7) कोणत्या विमानतळाने भारताशी जुळलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाश्यांसाठी ‘एयर सुविधा’ या नावाने एक संकेतस्थळ विकसित केले?

उत्तर :- दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ


Q8) निधन झालेले मनीतोम्बी सिंग कोणत्या क्षेत्रात प्रसिद्ध होते?

उत्तर :- फुटबॉल


Q9) कोणत्या व्यक्तीची मुंबईत प्राप्तिकर विभागाचे प्रधान मुख्य आयुक्त पदावर नेमणूक झाली?

उत्तर :- पतंजली झा


Q10) कोणत्या व्यक्तीची RoDTEP योजनेच्या अंतर्गत कमाल मर्यादा निश्चित करण्यासाठी नेमलेल्या समितीच्या अध्यक्षपदी नेमणूक झाली?

उत्तर :-  जी. के. पिल्लई

No comments:

Post a Comment