● भारतातील सर्वात लांब चेनानी-नशरी बोगद्याचे नाव -------------- हे ठेवण्यात आले? :- डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी
जम्मू-काश्मीरमधील NH-44 वरील भारतातील सर्वात लांब चेनानी-नशरी बोगद्याचे नाव भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी असे ठेवण्यात आले. या बोगद्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २ एप्रिल २०१७ मध्ये केले होते. हे पाटनिटॉप बोगदा म्हणून देखील ओळखले जाते. ९.२ किमी लांबीचा हा बोगदा आशियातील सर्वात उच्च तंत्रज्ञानाचा बोगदा मानला जातो. (जगात महामार्गावरील सर्वात मोठा बोगदा ऑरलॅड व आयरडेल मार्गावर नार्वत आहे. त्याची लांबी २४.५१ कि. मी. आहे) हा बोगदा जम्मू-श्रीनगर महामार्गाचा एक भाग आहे आणि शिवालिक डोंगराच्या मध्यभागी आहे. यामुळे श्रीनगर आणि जम्मू हा रस्ता दोन तासात पूर्ण झाला आहे. या बोगद्याच्या निर्मितीमुळे जम्मू आणि श्रीनगरमधील अंतर ३० किलोमीटरने कमी झाले आहे. या बोगद्याचे प्रत्यक्ष काम युपीए सरकारच्या कालखंडात २३ मे २०११ रोजी सुरु झाले होते.
● राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाक्यावरून जाण्या- येण्यासाठी वाहनांवर फास्ट टॅग नावाचा स्टीकर लावणे बंधनकारक केले :- १ डिसेंबर २०१९
एक देश एक फास्ट टॅग या धोरणांतर्गत राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणातर्फे १ डिसेंबर २०१९ पासून राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाक्यावरून जाण्या- येण्यासाठी वाहनांवर फास्ट टॅग नावाचा स्टीकर लावणे बंधनकारक केले आहे. सध्या ५२७ राष्ट्रीय महामार्गावर एकूण टोलनाके आहेत तर ३८० नाक्यावर फास्ट टॅग यंत्रणा कार्यरत आहे. या फास्ट टॅगची (राष्ट्रीय महामार्ग शुल्क ) मूळ कल्पना २००८ मधील म्हणजे युपीए सरकारच्या काळातील आहे.
● 2021 ची जनगणना ............ भाषांमध्ये होणार आहे :- १६
2021ची जनगणना 16 भाषांमधून केली जाणार आहे. ही जनगणना मोबाईल ॲपच्या माध्यमातून केली जाणर आहे. जनगणना दोन टप्प्यात करण्यात येणार आहे. घर-यादी आणि घर गणना एप्रिल ते सप्टेंबर 2020 मध्ये तर लोकसंख्या गणना 9 ते 28 फेब्रुवारी 2021 दरम्यान होणार आहे.
● 2 डिसेंबर 2019 रोजी आशियाई विकास बँकेचे दहावे अध्यक्ष म्हणून * कोणाची निवड करण्यात आली:- मसात्सुगु असकावा
2 डिसेंबर 2019 रोजी, मसात्सुगु असकावा यांची आशिया विकास बँकेचे दहावे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. त्याचा कार्यकाळ 17 जानेवारी 2020 पासून सुरू होईल. या पदावर ते टेकिको नाकाओची जागा घेणार आहेत. ते 23 नोव्हेंबर 2021 रोजी संपणार्याक टेकिको नाकाओच्या अध्यक्षपदाचा उर्वरित कार्यकाळ पूर्ण करतील. मसात्सुगु आसाकावा सध्या जपानचे पंतप्रधान आणि अर्थमंत्री यांचे विशेष सल्लागार म्हणून कार्यरत आहेत.
आशियाई विकास बँक:-
स्थापना:- १९ डिसेंबर १९६६
मुख्यालय:- मनीला, (फिलिपाईन्स)
एकूण सदस्य:-६८
● पुरुषांच्या विश्वचषक हॉकी स्पर्धाचे आयोजन २०२३ मध्ये १३ ते २९ जानेवारी दरम्यान कोणत्या देशात होणार आहे:- भारत
आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने (एफआयएच) २०२३ मध्ये होणाऱ्या विश्वचषक हॉकी स्पर्धेचे यजमानपद भारताला बहाल केले. भारतात सलग दुसऱ्यांदा विश्वचषक हॉकी स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धा
भुवनेश्वर आणि राउरकेला (ओडीशा) येथे होणार आहे. विश्वचषक हॉकी स्पर्धेचे चौथ्यांदा आयोजन करणारा भारत हा पहिला देश ठरणार आहे. याआधी भारताने १९८२ (मुंबई), २०१० (नवी दिल्ली) आणि २०१८ (भुवनेश्वर) साली विश्वचषक हॉकी स्पर्धा आयोजित केली होती. नेदरलँड्सने तीन वेळा विश्वचषक स्पर्धा भरवली आहे.
● लोकपालने -------------- हे ब्रीद वाक्य स्वीकारले आहे :- मा गृधः कस्यस्विद्धनम्
• 26 नोव्हेंबर 2019 रोजी लोकपालचे अध्यक्ष न्यायमूर्ती पिनाकी चंद्र घोष यांच्या हस्ते नवी दिल्लीत लोकपालच्या बोधचिन्हाचे (लोगो) प्रकाशन व लोकपालचे ब्रीदवाक्य (घोषवाक्य / motto) म्हणून “मा गृधः कस्यस्विद्धनम्” स्वीकारण्यात आले. लोकपालपीठाने सर्वसंमतीने ‘ईशावास्योपनिषध’ याच्या पहिल्या श्लोकात असलेल्या “मा गृधः कस्यस्विद्धनम्” या वाक्याची निवड केली. ‘मा गृधः= लोभ करु नका’; ‘कस्यस्वित्=कोणाच्याही’, ‘धनम्=धनाचा’ म्हणजेच “कोणाच्याही संपत्तीचा लोभ करु नका” असा या वाक्याचा अर्थ होतो लोकपालच्या बोधचिन्ह आणि ब्रीदवाक्यासाठी एक मुक्त स्पर्धा घेण्यात आली होती. या निवड प्रक्रियेततून उत्तरप्रदेशच्या प्रयागराजचा रहिवासी प्रशांत मिश्रा यांच्या चिन्हाची निवड करण्यात आली.
No comments:
Post a Comment