Saturday, 31 October 2020

'माहीत आहे का तुम्हांला ?


◾️ राजस्थानमधील जयपूरचे महाराजा सवाई जयसिंह (द्वितीय) हे खगोलशास्त्रज्ञ, गणितज्ञ आणि वास्तुविशारद होते.


◾️ तयांनी अठराव्या शतकात उज्जैन, वाराणसी, जयपूर, दिल्ली आणि मथुरा या पाच ठिकाणी जंतर-मंतर (खगोलीय वेधशाळा) बांधले. 


◾️आज मथुरा येथील जंतर-मंतर अस्तित्वात नाही परंतु उर्वरित चारही ठिकाणी असलेल्या वेधशाळांना आपण भेट देऊ शकतो. 


◾️आजही जंतर-मंतरमध्ये सावलीद्वारे सेकंदापर्यंत अगदी अचूक वेळ मिळते. 


◾️जतर-मंतर केवळ सूर्याच्या प्रकाशामुळे पडणाऱ्या सावलीवरून वेळ दाखविणारे घड्याळ नव्हे तर त्या खगोलशास्त्रीय वेधशाळा आहेत. या ठिकाणाहून खगोलांच्या निरीक्षणाची सोयही उत्तम आहे.


◾️जतर-मंतर मधील यंत्रांच्या साहाय्याने आजही खगोलीय वेध घेणे शक्य आहे. 


◾️अत्याधुनिक उपकरणांचा शोध लागल्यानंतर आता मात्र ही यंत्रे 'सांस्कृतिक वारसा' म्हणूनच महत्त्वाची ठरली आहेत.


No comments:

Post a Comment

Latest post

चलेजाव आंदोलन (१९४२)

▪️घटनाक्रम ― क्रिप्स मिशनचे अपयश, जपानचा धोका उंबरठयावर, सरकारवरचा राग सामुदायिक परिणाम ६ जुलै १९४२ रोजी वर्धा येथे काँग्रेस कार्यकारिणी बैठ...