Saturday, 17 October 2020

राजा राममोहन रॉय



 भारतीय समाजसुधार होते. त्यांचा जन्म बंगालमधील हुगळी गावातील ब्राह्मण कुटुंबात २२ मे १७७२ रोजी झाला.त्या काळात प्रशासनासाठी वापरली जाणारी भाषा पर्शियन व अमेरिका होती. त्यामुळे पर्शियन व अरेबिक शिकण्यासाठी त्यांना पाटणा येथे पाठविण्यात आले. त्यानंतर ते बौद्ध धर्माचा अभ्यास करण्यासाठी तिबेट व बनारसला गेले. पर्शियन व अरेबिक भाषेत त्यांनी वेदांत ग्रंथ हे पहिले पुस्तक लिहले. १८१५ मध्ये कोलकत्ता येथे परतल्यावर त्याचे बंगाली भाषेत रुपांतर(भाषांतर) केले. त्यांना "राजा"हि पदवी मुगल सम्राट अकबर{द्वितीय} याने बहाल केली. मुगल सम्राटचे राजदूत म्हणून ते इंग्लंडला गेले होते. भारतातून इंग्लंडला जाणारे ते पहिले भारतीय होते.राजा राममोहन रॉय यांना भारतात नव विचाराचे जनक म्हंटले जातात.त्यांनी सर्वप्रथम "ब्रह्मपत्रिका"नावाचे वृत्तपत्र सुरु केले.ते पहिले उच्चशिक्षित व्यक्ती होते. ते भारतातून इंग्लडला गेले.त्यांनी मूर्तीपूजेला,देवदेवतांच्या पूजेला विरोध केला. जीवसृष्टीचा निर्माता एकच आहे व तो निर्गुण, निराकार आहे,असे ते मानत होते. हिंदू धर्मातील कालबाह्य झालेल्या रूढी व परंपराना त्याचा विरोध होता.भारतातील समाजाला नवी दिशा देणे ही त्यांची इच्छा होती.त्यासाठी त्यांनी १८३० साली ब्राम्हो समाजाची स्थापना केली.ख्रिश्चन धर्माचा आभ्यास केला.प्रथा ,परंपराविरुद्ध लढा दिला. भारतातील धर्मव्यवस्था, अर्थव्यवस्था, व शिक्षणव्यवस्था यासंदर्भात लेखन करण्यास सुरुवात केली.त्यासाठी काही वृतपत्रे तसेच सुधारणा चळवळ सुरु केली.त्यांना भारतीय सुधारणेचे जनक म्हटले जाते. 


🌷वत्तपत्रे - 

त्यांनी ४ डिसेंबर १८२१ रोजी संवाद कैमुदी हे बंगाली भाषेतील तर १२ एप्रिल १८२२ रोजी मिरात_उल_ अखबार हे पर्शियन व्रतपत्र सुरु केले. त्यांनी १८२८ साली प्रेसिदेन्शी कॉलेज सुरु केले.


🌷शिक्षण -

२२ मे १७७२ रोजी बंगालमधील राधानगर येथे जन्मलेल्या राममोहन यांच्या जडणघडणीत त्यांच्या माता-पित्यांच्या घराण्यांचा संबंध फार मोठा आहे. वडीलांकडील सर्व मंडळी आधुनिक शिक्षण घेतलेली आणि बहुतांश सरकार दरबारी मोठ्या हुद्द्यावर नोकरी करणारी होती. त्यामुळेे त्यांच्या वडीलांनी वयाच्या नवव्या वर्षी त्यांना अरबी, फारसी या त्याकाळच्या सरकारात / व्यवहारात वापरल्या जाणार्‍या भाषा आणि शास्त्र शिकण्यासाठी पाटण्याच्या एका मदरशात (मुक्तब) पाठवल. मदरशामधे अरबी आणि फारसी भाषांबरोबरच त्यांनी इस्लाम धर्म आणि सुफी पंथ, शायर आणि शायरी यांचादेखील अभ्यास केला. हाफीज आणि सादी हे त्यांचे आवडते शायर होते.तिथ शिक्षण घेतल्यानंतर वयाच्या बाराव्या वर्षी आईच्या प्रभावामुळे, ज्यांच्या माहेरची मंडळी प्रामुख्यान पौरोहित्य करणारी होती, धार्मिक शिक्षण घेण्यासाठी म्हणून बनारस (काशी) इथ त्यांना पाठवण्यात आल. तिथ त्यांनी संस्कृत भाषेबरोबरच वेद, वेदांत, उपनिषदे अशा गोष्टींचा अभ्यास केला. सोळाव्या वर्षापर्यंत त्यांनी बनारस मधे वास्तव्य केल. हे अस दोन टोकाच्या किंवा पूर्ण वेगवेगळ्या व्यवस्थेत शिक्षण घेउन राम मोहन वयाच्या सोळाव्या वर्षी घरी परत आले. घरी परतल्यावर त्यांनी तुहफतूल मुवाहीद्दीन (एकेश्ववरवाद्यांना भेट) नावाचा अरबीत प्रस्तावना असणारा एक लेख फारसीमधे लिहीला. यामधे त्यांनी मूर्तीपूजेवर कडाडून टीका केली होती. त्यांच्यामते मूर्तीपूजा ही वेदांच्या शिकवणुकीच्या विरुद्ध होती. त्या लेखामुळ वडीलांशी त्यांचे पटेनास झाल आणि स्वत्:च घर सोडून निघून गेले.

No comments:

Post a Comment

Latest post

Eklavya

विद्या प्रबोधिनी कोल्हापूर : CLICK HERE राष्ट्रनिर्माण प्रबोधनी : CLICK HERE स्पर्धाशाही acadeny : CLICK HERE रयत प्रबोधनी : CLICK HERE सारथ...