- कर्मचारी राज्य विमा महामंडळाने(ESIC) २०१८ मध्ये सुरू केली होती. कोविड-१९ मुळे योजनेच्या नियमात बदल व शिथिलता आणली आहे.
- संगठित क्षेत्रातील कर्मचारी जे ESIC मध्ये विमाकृत आहेत त्या व्यक्तीस राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय अडचणींमुळे १(यापूर्वी३ महिने) महिन्यांपेक्षा जास्त काळ नोकरी गमवावी लागल्यास त्यास जास्तीत जास्त २४ महिन्यांपर्यंत साहाय्य उपलब्ध करून देणे!
- वेतनाच्या ५०%(यापूर्वी २५%) एवढे साहाय्य दिले जाते.
✅ "काळ्या समुद्रात" नैसर्गिक वायूचा साठा सापडल्याची घोषणा "तुर्कस्थान"चे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यीप एर्दोगेन यांनी केली. हा साठी 340 अब्ज घनमीटर एवढा असल्याचा अंदाज आहे.
✅ ३ रा ड्रॅगनफ्लाय महोत्सव, २०२०
- वर्ल्ड वाईड फ़ंड(wwf) व बॉम्बे नॅचरल हिस्ट्री यांच्या संयुक्त विद्यमाने "ड्रॅगनफ्लाय कीटकांचे संवर्धन व्हावे यासाठी"
- यावर्षी केरळमध्ये "थंबी महोत्सवम" हा याचाच एक भाग म्हणून साजरा केला जाणार आहे.
- २०१८ मध्ये सुरुवात.
✅ "तृतीयपंथी व्यक्तींसाठी राष्ट्रीय परिषद" स्थापन
- तृतीयपंथी व्यक्ती(हक्क संरक्षण) कायदा, २०१९ अंतर्गत स्थापना.
- अध्यक्ष- केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री
- सदस्य- इतर खात्यांचे प्रतिनिधी, तृतीयपंथी प्रतिनिधी, नीती आयोग, मानवी हक्क आयोग इ.
No comments:
Post a Comment