Monday, 26 October 2020

“ट्यूबरिअल सलायवरी ग्लॅंड”: मानवी शरीरात नव्या अवयवाचा शोध


🔰वैज्ञानिकांनी मानवी शरीरातल्या एका अनोख्या अवयवाचा शोध लावला आहे. नेदरलँडच्या वैज्ञानिकाने कर्करोगाची तपासणी आणि उपचार करत असताना मानवी शरीराच्या एका नव्या अवयवाचा शोध लावला आहे.


🔴 ठळक बाबी


🔰सशोधकांना दिसून आले की, गळ्याच्या वरच्या भागातल्या ग्रंथीमध्ये एक अवयव आहे. या अवयवाबद्दल अजूनही पूर्ण माहिती मिळालेली नाही.


🔰मानवी शरीरात आढळून आलेल्या या अवयवाला वैज्ञानिकांनी “ट्यूबरिअल सलायवरी ग्लॅंड” असे नाव दिले आहे. शरीरातला हा अवयव वंगणाच्या क्रियेसाठी फायदेशीर ठरतो.


🔰गरंथीच्या समुहाद्वारे कळून आले की, हा नवीन अवयव 1.5 इंचाचा आहे. लाळग्रंथींप्रमाणे हा अवयव काम करतो.


🔴 पार्श्वभूमी


🔰नदरलँडच्या एम्सटर्डम कॅन्सर इंस्टीट्यूटचे तज्ज्ञ प्रोस्टेट (मूत्राशयाच्या निमूळत्या भागावर असणारी ग्रंथी) कर्करोगाची तपासणी करण्यासाठी PSMA PET-CT स्कॅनचे परिक्षण करत होते. यादरम्यान एका रेडियओएक्टीव्ह ट्रेसरला मानवी शरीरात टाकण्यात आले होते. रेडिओएक्टीव्ह ट्रेसरमुळे या नवीन अवयवाचा शोध लागला.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...