🔰‘‘आज सकाळी एका व्यक्तीने दारावर टकटक केली. दार उघडले तर समोर बॉब विल्सन उभे होते. त्यांनी नोबेलची पुरस्काराची बातमी आपल्याला दिली. हा सगळा विचित्र योगायोग होता.
🔰 आम्ही दोघेही नोबेलचे मानकरी ठरलो व विल्सन यांनी आपल्याला ही माहिती दिली’’, असे स्टॅनफर्ड विद्यापीठातील प्राध्यापक पॉल. आर. मिलग्रोम यांनी सांगितले. एक प्रकारे गुरू-शिष्य परंपरेचा हा सन्मान झाला आहे, असे म्हणायला हरकत नाही.
🔰मिलग्रोम यांनी म्हटले आहे की, विल्सन हे माझे पीएच डीचे सल्लागार आहेत. ते समोरच्या रस्त्यावर राहतात. त्यामुळे त्यांनी माझ्याकडे येऊन दोघांनाही नोबेल मिळाल्याची ही बातमी दिली. अगदी गोड अशीच ही बातमी होती. विद्यार्थी, मित्र व सहकारी यांची आम्हाला नोबेल मिळावे ही इच्छा होती ती आज पूर्ण झाली. चाहत्यांचे प्रेम व आदरही आम्हाला मिळाला.
🔰विल्सन यांनी सांगितले की, मिलग्रोम हा माझा माजी विद्यार्थी. लिलावाबाबतच्या संशोधनात तो अगोदरपासून चमक दाखवत होता. आम्ही १९७० मध्ये पहिल्यांदा लिलावाबाबतचे संशोधन केले. अनेक आर्थिक प्रक्रियात सुधारणा करण्यासाठी त्याचा वापर करण्याचा आमचा हेतू आहे.
No comments:
Post a Comment