Wednesday 21 October 2020

गौतम बुद्ध : परिचय.

🧩 महामाया...

  🅾️या कोलिय वंशाच्या राजकुमारी होत्या. त्या शाक्य नरेश शुद्धोधन यांच्या पत्नी व  गौतम बुद्धांच्या आई होत्या.


🧩राहुल...

🅾️हा यशोधरा व गौतम बुद्धांचा एकमेव पुत्र होता. राहुल बुद्ध संघात सामील होऊन भिक्खू बनला.


🧩 महाप्रजापती गौतमी ...

🅾️महाप्रजापती गौतमी या महामाया बहिण व कोलिय वंशाच्या राजकुमारी होत्या. त्या शाक्य नरेश शुद्धोधन यांच्या दुसऱ्या पत्नी व गौतम बुद्धांच्या मावशी व सावत्र आई होत्या. नंतर या भिक्खूणी बनल्या.

गौतम बुद्ध : जन्म .

🅾️सिद्धार्थाचे जन्मस्थळ लुंबिनी आणि त्याचे बालपण गेले ती कपिलवस्तू राजधानी, सध्याच्या नेपाळ मध्ये आहे. गौतम बुद्धांची मातृभाषा पाली होती. त्याचे राज्य प्रजासत्ताक होते. बौद्ध साहित्यानुसार, त्यांचे पिता राजा शुद्धोधन शाक्य या कोशल प्रांताचे राजा होते. 

🅾️लोक कथेनुसार शुद्धोदन हे नागवंशीय इक्ष्वाकू घराण्याचे वंशज होते.

🅾️ राजा शुद्धोदनाची पत्‍नी राणी महामाया ही सिद्धार्थाची आई. शाक्यांच्या चालीरितींनुसार राणी महामाया प्रसूतीसाठी माहेरी निघाली आणि वाटेत लुंबिनीमधील बागेत एका शालवृक्षाखाली प्रसूत झाली. हा दिवस थेरवाद राष्ट्रे वेसाक (वैशाख) म्हणून साजरा करतात.

 🅾️सिद्धार्थाच्या जन्मानंतर काही दिवसांनी महामायेचे निधन झाले. बाळाचे नांव ‘सिद्धार्थ’ असे ठेवण्यात आले. गौतम बुद्ध : प्रारंभिक जीवन.💠💠

🅾️राजपुत्रांचे वैभवशाली आयुष्य जन्मतःच प्राप्त झालेला सिद्धार्थ सुखात वाढत होता. 

🅾️जन्मदात्या मातेच्या जागी त्याचे पालनपोषण त्याच्या मावशीने – गौतमीने पोटच्या पोराप्रमाणे केले. तिची माया, नोकरचाकर, दासदासी, गजान्तवैभव आणि राजसुलभ अशा सुखवैभवाचा जणूकांही कोटच राजा शुद्धोदनाने त्याच्या भोवताली उभा केला होता. 

🅾️तयाने सिद्धार्थाला चक्रवर्ती राजाच बनवण्याचा चंग बांधला होता. दैन्य, दुःख, ताप, त्रास, वेदना यांचा त्यास वाराही लागू नये, धार्मिक वा आध्यात्मिक विचार, वैराग्य, यांपासून तो कोसभर दूरच रहावा अशी राजा शुद्धोदनाची पितृसुलभ इच्छा होती.



गौतम बुद्ध : प्रारंभिक जीवन.

🅾️राजपुत्रांचे वैभवशाली आयुष्य जन्मतःच प्राप्त झालेला सिद्धार्थ सुखात वाढत होता. 

🅾️जन्मदात्या मातेच्या जागी त्याचे पालनपोषण त्याच्या मावशीने – गौतमीने पोटच्या पोराप्रमाणे केले. तिची माया, नोकरचाकर, दासदासी, गजान्तवैभव आणि राजसुलभ अशा सुखवैभवाचा जणूकांही कोटच राजा शुद्धोदनाने त्याच्या भोवताली उभा केला होता. 

🅾️तयाने सिद्धार्थाला चक्रवर्ती राजाच बनवण्याचा चंग बांधला होता. दैन्य, दुःख, ताप, त्रास, वेदना यांचा त्यास वाराही लागू नये, धार्मिक वा आध्यात्मिक विचार, वैराग्य, यांपासून तो कोसभर दूरच रहावा अशी राजा शुद्धोदनाची पितृसुलभ इच्छा होती.

गौतम बुद्ध : विवाह.

🅾️सोळा वर्ष वय झाल्यावर शुद्धोदनाने सिद्धार्थाचा विवाह यशोधरेशी लावून दिला. यथावकाश, तिने एका मुलास जन्म दिला. त्याचे नांव राहुल असे ठेवण्यात आले. 

🅾️धनवैभव, मानमरातब, प्रेमळ पत्‍नी, राजस पुत्र- सौख्यास कांहीही कमी नाही असे २९ वर्षांचे आयुष्य, सिद्धार्थाला त्याच्या पित्याच्या इच्छेप्रमाणे चक्रवर्ती राजा होण्याच्या दिशेने सरळ रेषेत चालले होते.

 गौतम बुद्ध : ज्ञानप्राप्ती.

🅾️गहत्यागानंतर सिद्धार्थ गौतमाने ज्ञानप्राप्तीसाठी खूप चिंतन केले, कठोर तपस्या केली.

 🅾️आताच्या बिहार राज्यातील गया येथे निरंजना नदीच्या काठी पिंपळाच्या वृक्षाखाली ध्यानस्थ बसले असता इ.स.पू. ५२८ मध्ये वैशाखी पौर्णिमेच्या दिवशी त्यांना दिव्य ज्ञानप्राप्ती झाली. या ‘दिव्य ज्ञाना’ला ‘संबोधी’, ‘बुद्धत्व’ किंवा ‘निर्वाण’ असेही म्हणतात. 

🅾️जञानप्राप्तीनंतर सिद्धार्थ गौतमाला सर्वजण ‘बुद्ध’ असे म्हणू लागले. बुद्ध ही व्यक्ती नव्हे ती ज्ञानाची अवस्था आहे. ‘बुद्ध’ म्हणजे अतिशय ज्ञानी मनुष्य. बुद्धांना ज्या पिंपळाच्या वृक्षाखाली ‘बुद्धत्व’ प्राप्त झाले त्या वृक्षाला ‘बोधी वृक्ष’ (ज्ञानाचा वृक्ष) असे म्हणतात.

गौतम बुद्ध : परिनिर्वाण.

🅾️इ.स.पू. ५६३ ते इ.स.पू. ४८३ हा भगवान गौतम बुद्धांचा कालावधी.

🅾️बद्धांना ज्या पिंपळाच्या वृक्षाखाली बुद्धत्व प्राप्त झाले त्या वृक्षाला बोधी वृक्ष (ज्ञानाचा वृक्ष) असे म्हणतात.

 🅾️जञानी बुद्धांनी उत्तर प्रदेश मधील सारनाथ येथे पाच पंडितांना पहिला उपदेश दिला. त्यांच्या पहिल्या उपदेशास धम्मचक्रप्रवर्तन किंवा धम्मचक्कपवत्तन असे म्हणतात. या प्रवचनात बुद्धांनी बौद्ध धम्माची मूलतत्त्वे सांगितली. त्यात त्यांना अनेक शिष्य लाभले आणि बौद्ध धर्म वाढीस लागला.

No comments:

Post a Comment