Wednesday, 21 October 2020

ड्रॅगनला झटका, मलाबार युद्ध कवायतीसाठी भारताने जोडला एक नवा मित्र.



🔰दरवर्षी आयोजित होणाऱ्या मलाबार नौदल युद्ध कवायतींमध्ये आता आणखी एक देश सहभागी होणार आहे. या युद्ध कवायतीच्या निमित्ताने भारताने एक नवीन मित्र जोडला आहे. पूर्व लडाख सीमेवर असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनसाठी हा एक झटका आहे. कारण मलाबार नौदल कवायतीच्या निमित्ताने चीन विरोधात एक भक्कम आघाडी उभी करण्यासाठी मागच्या काही दिवसांपासून प्रयत्न सुरु आहेत.


🔰आता भारत, अमेरिका आणि जपानसह ऑस्ट्रेलियन नौदलही मलाबार युद्ध कवायतीमध्ये सहभागी होणार आहे. आतापर्यंत फक्त भारत, अमेरिका आणि जपान हे तीनच देश या कवायतीमध्ये सहभागी व्हायचे. नोव्हेंबर महिन्यात हा युद्धाभ्यास होणार आहे. मागच्या काही दिवसांपासून ऑस्ट्रेलियाला या कवायतीमध्ये सहभागी होण्याचे निमंत्रण देण्याविषयी विचार सुरु होता.


🔰या निर्णयावर चीनची प्रतिक्रिया काय असेल? याबद्दल थोडी चिंता होती. भारताप्रमाणेच चीनचे अमेरिका, जपान या देशांबरोबरही फारसे जमत नाही. ऑस्ट्रेलिया बरोबरही त्यांचे तीव्र मतभेद निर्माण झाले आहेत. या महिन्याच्या सुरुवातील टोक्योमध्ये भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या क्वाड गटाची बैठक पार पडली.


🔰कवाड गटातील चारही देश चीनच्या विस्तारवादी आणि वर्चस्व गाजवण्याच्या प्रवृत्तीमुळे त्रस्त आहेत. दक्षिण चीन समुद्र आणि व्यापारावरुन चीनचा अमेरिकेबरोबर वाद सुरु आहे. भारताबरोबर सीमावाद चालू आहे. “मलाबार कवायती २०२० ऑस्ट्रेलियन संरक्षण दलासाठी एक मोठी संधी आहे” असे ऑस्ट्रेलियाचे संरक्षण मंत्री लिंडा रेनॉल्ड यांनी म्हटले आहे. ऑस्ट्रेलिया यापूर्वी २००७ साली शेवटचे मलाबार कवायतीमध्ये सहभागी झाला होता.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...