Wednesday 7 October 2020

सामान्य ज्ञान प्रश्नोत्तरे



● भारताबाहेरील पहिल्या योग विद्यापीठाचे नाव काय?


*उत्तर* : ‘विवेकानंद योग विद्यापीठ’ (VAYU)


● समुदायाप्रती सार्वजनिक सेवेचे मूल्य आणि विकास प्रक्रिया याबाबत जागृती निर्माण करण्यासाठी ‘संयुक्त राष्ट्रसंघ लोकसेवा दिन’ कधी साजरा केला जातो?


*उत्तर* : 23 जून 


●  मुख्यमंत्री दूरस्थ शिक्षण कार्यक्रमाच्या अंतर्गत विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी हरयाणा सरकारसोबत कोणत्या कंपनीने करार केला?


*उत्तर* : रिलायन्स जिओ


● ‘बीदौ उपग्रह प्रणाली’चे प्रक्षेपण कोणत्या देशाने पूर्ण केले आहे?


*उत्तर* : चीन 


● ‘जिवाणू पेशी’चे आवरण नष्ट करणारे ‘नॅनोझाइम’ कोणत्या संस्थेनी विकसित केले आहे?


*उत्तर* : भारतीय विज्ञान संस्था, बंगळुरु


● प्रथम ऑनलाइन ‘कान चित्रपट महोत्सव-2020’ मधील आभासी ‘इंडिया पॅव्हिलियन’चे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले?


*उत्तर* : प्रकाश जावडेकर (माहिती व प्रसारणमंत्री)


● चीनचा ‘दिओयू’ बेट यांच्या मालकी मुद्द्यावरून जापान आणि तैवान सोबत वाद चालू आहे. अलीकडेच जापानने या बेटाला दिलेले नवीन नाव काय आहे?  


*उत्तर* : ‘टोनोशिरो सेनकाकू’


● रमेश पोखरियाल यांनी उद्घाटन केलेल्या द्वितीय आवृत्तीच्या YUKTI योजनेचे पूर्ण नाव काय?


*उत्तर* : Young India combating COVID with Knowledge, Technology, and Innovation


● ‘वंदे भारत मिशन’ या अभियानाचा उद्देश काय?


*उत्तर* : 'कोरोना'च्या पार्श्वभूमीवर परदेशात अडकलेल्या भारतीयांना परत आणणे.


● येस बँकेनी UDMA टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या सहकार्याने कोणते  मोबाइल अ‍ॅप एक डिजिटल वॉलेट सुविधा म्हणून सादर केले.


*उत्तर* : ‘युवा पे’


● भारतीय हवामान विभाग (IMD) याचे वर्तमान महानिदेशक कोण आहे?


*उत्तर* : डॉ. मृत्युंजय महापात्रा


● MSME मंत्री नितीन गडकरी यांनी ‘CGSSD’ योजनेचे उद्घाटन केले. त्या CGSSD याचे पूर्ण नाव काय?


*उत्तर* : Credit Guarantee Scheme for Sub-ordinate Debt


● NASA संस्थेच्या मुख्यालय इमारतीचे नाव कोणाच्या नावावरून ठेवले जाणार आहे.


*उत्तर* : मेरी जॅक्सन (प्रथम आफ्रिकी- अमेरिकी महिला अभियंता)


● फ्लिपकार्टचे माजी सह-संस्थापक सचिन बन्सल यांनी स्थापना केलेल्या ‘वित्तीय सेवा’ स्टार्टअप उद्योगाचे नाव काय?


*उत्तर* : “नावी”


● ‘आसाम वायू गळती’ या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या समितीचे प्रमुख कोण आहेत?


*उत्तर* : न्यायमूर्ती बी. पी. कटाके


● ‘2023 फिफा महिला विश्वचषक’ स्पर्धा कोणत्या देशात आयोजित केली जाणार आहे?


*उत्तर* : ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड


No comments:

Post a Comment