Saturday 31 October 2020

बिहारचा रहिवासी बनला ‘या’ देशाचा राष्ट्रपती.



🔰बिहारमध्ये एकीकडे विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. तर, दुसरीकडे भारतापासून चार हजार किलोमीटर दूर असणाऱ्या सेशेल्स देशात बिहारच्या एका व्यक्तीने इतिहास रचला आहे. मूळचे भारतीय असलेल्या वैवेल रामकलावन यांची  सेशेल्स या देशाचे राष्ट्रपती म्हणून निवड झाली  आहे.


🔰माध्यमांच्या वृत्तानुसार, सेशेल्समध्ये झालेल्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत वैवेल रामकलावन यांना ५४ टक्के मतं मिळाली आहेत. त्यांनी डॅनी फॉरे यांचा मोठ्या मतांच्या फरकाने पराभव केला आहे.  तर त्यांचे वडिलोपार्जित गाव असलेल्या बरौली येथे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.


🔰ववेल रामकलावन यांचे घर गोपालगंज येथील बरौली क्षेत्रातील परसौनी येथे आहे. जिथे ते साधारणपणे दोन वर्षां अगोदर आले होते. दोन वर्षांपूर्वी ते जेव्हा आपल्या मूळ गावी आले होते, तेव्हा त्यांनी येथील मातीचा टिळा लावला होता व आपण गावकऱ्यांचे प्रेम कधीच विसरणार नाही असे म्हटले होते, असे ग्रामस्थांनी सांगितले आहे.


🔰शिवाय, त्यांनी गावी पुन्हा येण्याचे देखील म्हटले होते. त्यावेळीच त्यांनी मी जेव्हा पुन्हा येईल तेव्हा राष्ट्राध्यक्ष बनून येईल, असा विश्वास व्यक्त केला होता. सर्व ग्रामस्थ त्यांना खूप मानतात. गावाचा एक पुत्र एका देशाचा राष्ट्रपती बनला असल्याचे ते अभिमाने सांगतात. खरंतर या गावाची परिस्थिती फारशी चांगली नाही, गाव अत्यंत मागासलेलं देखील आहे. वैवेल रामकलावन यांच्या पूर्वज जवळपास १३५ वर्षांपूर्वी गाव सोडून, कलकत्ता मार्गे मॉरीशसला पोहचले होते. असे ग्रामस्थांनी सांगितलं आहे.

No comments:

Post a Comment